‘त्या’ विधानानंतर चंद्रकांतदादांना बारामतीला यायला मज्जाव?,अजितदादांनी सांगितलं आतलं राजकारण

Ajit Pawar On Chandrakant Patil : लोकसभा निवडणूक 2024 चा महासंग्राम सुरु आहे. या राजकीय युद्धात दोन्ही गटांनी आरोप-प्रत्यारोपांचा तुफान वर्षाव केला. एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी सोडली नाही. पण महायुतीतील एका धुसफूसीची पण चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे..दोन दादांमधील हे वाग्युद्ध आहे तरी काय?

'त्या' विधानानंतर चंद्रकांतदादांना बारामतीला यायला मज्जाव?,अजितदादांनी सांगितलं आतलं राजकारण
दोन दादांमध्ये नाराजीचा सूर का
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 10:02 AM

Lok Sabha Election 2024 मध्ये राजकीय धुमशान सुरु आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले आहे. तळपत्या उन्हात महाविकास आघाडी आणि महायुतीने एकमेकांविरोधात आग ओकली आहे. एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी दोन्ही गटांनी सोडलेली नाही. अनेक ठिकाणी एकमेकांना खो देण्याचा प्रयत्न झाला आहे. तर भाजपने पण मित्रपक्षांना खो दिल्याचे अनेक मतदारसंघात समोर आले आहे. मतदारसंघचं पळविण्यात आले आहेत. त्यातच महायुतीतील एक अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. चंद्रकांतदादा विरुद्ध अजितदादा असा सामना झाला. त्यात आता एक सीमारेषा आखली गेली आहे.

दोन दादांत नाराजीचा सूर का?

निवडणुकीच्या धामधुमीत चंद्रकांत पाटील यांचे एक वक्तव्य फार चर्चेत आलं. “शेवटी राजकारणात एक तराजू लावायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलकं आहे, आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्याला शरद पवार यांचा पराभव हवा आहे. बाकी काही नको”, असं ते म्हणाले होते. एकप्रकारे चिमटाच त्यांनी काढला होता. त्यांच्या वक्तव्याने अजितदादा मात्र दुखावल्या गेले. त्यांनी या वक्तव्यावर त्यांची नाराजी बोलून दाखवली.

हे सुद्धा वाचा

अजितदादांची नाराजी

“हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते”, असा टोला अजित पवार यांनी महायुतीच्या समन्वय बैठकीत हाणला. अर्थात त्यांचा रोख हा चंद्रकांत पाटील यांच्यावर होता, हे वेगळं सांगायची गरज नाही. ही धुसफूस चव्हाट्यावर आल्यावर चंद्रकांतदादांनी अद्याप त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.

चंद्रकांतदादांन बारामतीत येण्यास मज्जाव

शरद पवारांचा पराभव करणे हेच आमचे उदीष्ट हे चंद्रकांत पाटील यांचे विधान चुकीचे. त्यांची चुक झाली हे मी मान्य करतो. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले तुम्ही बारामतीत येऊ नका. आम्ही पाहतो. त्यानंतर ते चुप आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांच्या वक्तव्याचा समाचार

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार यांनी राजकीय बॉम्ब टाकला. काँग्रेसमध्ये अनेक पक्ष विलीन होऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले. राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत दिले.अजित पवार यांनी काकांचे विधान फारसे काही मनावर घेतले नाही. शरद पवार यांच्यासोबत दीर्घ राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. शरद पवार अथवा उद्धव ठाकरे हे काही काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत. कधी कधी संभ्रम निर्माण होण्यासाठी ते असे विधान करतात, असा टोला त्यांनी हाणला.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.