Sanjay Raut : आम्ही तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊतांनी महायुतीवर केला प्रहार

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता टिपेला पोहचला आहे. संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांचा त्यांनी तिखीट समाचार घेतला.बारामतीत आमची सगळी शिवसेना सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

Sanjay Raut : आम्ही तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊतांनी महायुतीवर केला प्रहार
संजय राऊत यांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 2:04 PM

राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष आता बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. बारामतीची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. पण आता तिथे पवार-विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. बारामतीत आमचेच पारडे जड यासाठी दोन्ही गट दंड बैठका मारत आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी आमची सगळी शिवसेना भक्कमपणे उभी असल्याचे संजय राऊत यांनी पुरंदरमधील प्रचार सभेतून सांगितले. यावेळी त्यांनी अजितदादांवर हल्लाबोल केला.

आम्ही तुमची चांगलीच तुतारी वाजवणार

ज्या पवारांनी पक्ष वाढवायला तुमच्या हातात दिला, तुम्ही कायं केलं, असा हल्लाबोल त्यांनी अजित पवार यांच्यावर केला. आचार्य अत्रे म्हणले असते असे हरामखोर 10 हजार वर्षात झाले नाही असे म्हणाले असते. तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्ही आता तुमची तुतारी चांगली वाजवणार आहे. आमची सगळी शिवसेना ताईच्या मागे ठाम पणे उभी आहे, असे ते म्हणाले. कोणीतरी ऐरेंगेरे गुजरातमधून येणारं आणि आमच्या पराभवासाठी बारामती ठाणं मांडून बसणार आहे. चंद्रकांत पाटील म्हणतात आम्ही शरद पवार यांना संपवायचं आहे. आले किती गेले किती बारामतीमध्ये शरद पवार यांचा दरारा असल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

निकालानंतर जनता तुम्हाला बघणार

अजित पवार यांचं काल भाषण ऐकलं, माझं कामं कर नाहीतर बघून घेईल. अरे तुम्ही कायं बघणार 4 जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईल. तुमच्या धमक्यांना जनता घाबरणार नाही. धमक्या देऊन निवडणूक लढवू नका, जनता तुमच्या धमक्याला भीक घालणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी अजितदादा यांच्यावर केला.

पंतप्रधानांना महाराष्ट्राची भीती

रोज बघावं तेंव्हा नरेंद्र मोदी, शहा महाराष्ट्रमध्ये आहेत, सगळा देश सोडला आणि महाराष्ट्रमध्ये येतं आहेत. त्यांना महाराष्ट्रची भीती वाटत असल्याचा चिमटा राऊत यांनी काढला. गेली 10 वर्ष पंतप्रधान नुसतं खोट बोलत आहेत. आम्ही विचार करतोय, नरेंद्र मोदी औरंगजेब सारखे का वागतात, त्याचा जन्म गुजरात मध्ये झाला होता. त्यामुळं ते शिवराय यांच्या महाराष्ट्रवर धावून येते आहेत. कोणी चाल करून येत असेल तर त्यांचा मान आम्ही राखणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.