‘ज्या मंडपात लग्न लागलं, त्याच मंडपात नवऱ्या मुलाचा मृतदेह ठेवण्याची वेळ’, बारामतीमधील दुर्देवी घटना

ज्या मंडपात तरुणाचं लग्न झालं, आज त्याच मंडपात त्याचा मृतदेह ठेवण्याची दुर्देवी वेळ आली. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुका हादरला आहे.

'ज्या मंडपात लग्न लागलं, त्याच मंडपात नवऱ्या मुलाचा मृतदेह ठेवण्याची वेळ', बारामतीमधील दुर्देवी घटना
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 8:55 PM

बारामती (पुणे) : लग्न आणि संसाराबद्दल तरुण-तरुणींचे भरपूर स्वप्न असतात. लग्न केल्यानंतर देव दर्शनाला जावं, त्यानंतर कुठेतरी फिरायला जावं, अशी जवळपास प्रत्येक नवविवाहित जोडप्याची इच्छा असते. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तशा गोष्टी घडू नये म्हणून आपण अतोनात प्रयत्न करु शकतो. पण काही वेळेला काय घडावं हे आपल्याही हातात नसतं. बारामतीत देखील एक अशीच घटना घडलीय. ज्या मंडपात तरुणाचं लग्न झालं, आज त्याच मंडपात त्याचा मृतदेह ठेवण्याची दुर्देवी वेळ आली. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुका हादरला आहे.

बारामतीत लग्नाच्या सहाव्या दिवशीच एका तरुणीचं कुंकू पुसलं गेलंय. नवऱ्या मुलाचा हृदयविकाराच्य तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे दुर्देवाने ज्या मंडपात लग्न झाले त्याच मंडपात मृतदेह ठेवण्याची वेळ आली. संबंधित घटना ही बारामती तालुक्यातील माळेगाव येथे घडलीय.

घरामध्ये लग्न कार्याचा आनंद हा वेगळाच असतो. हाच आनंद बारामती तालुक्यातील माळेगाव येथे राहणाऱ्या येळे कुटुंबीयांमध्येही होता. मात्र येळे कुटुंबाच्या आनंदावर काळाने घाला घातला .

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वीच लग्नासाठी नवरदेव म्हणून उभा राहिलेल्या सचिन उर्फ बबलू येळे याचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

लग्नासाठी घरासमोर येळे कुटुंबाने मंडप उभारला होता. आता या मंडपातच नवऱ्या मुलाचा मृतदेह ठेवण्याची दुर्दैवी वेळ येळे कुटुंबावर आली. या घटनेमुळे गावकऱ्यांच्या देखील डोळ्यांमध्ये पाणी आलंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.