पवार कुटुंबात फूट, पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवा, गोविंदबागेत शरद पवार, तर काटेवाडीत अजितदादांना भेटण्यासाठी समर्थकांची गर्दी

Baramati Diwali Padawa : आज दिवाळी पाडवा आहे. बारामतीची परंपरा आहे की पवार कुटुंबीय मोठ्या उत्साहात दिवाळी आणि विशेष करून पाडवा साजरा करतात. पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात. मात्र यंदा पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडावा साजरा होत आहे. वाचा सविस्तर बातमी...

पवार कुटुंबात फूट, पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवा, गोविंदबागेत शरद पवार, तर काटेवाडीत अजितदादांना भेटण्यासाठी समर्थकांची गर्दी
शरद पवार, अजित पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 8:34 AM

राज्याच्या राजकारणात सुरु असलेला संघर्ष आता पवार कुटुंबात देखील पाहायला मिळत आहे. इथून पाठीमागे अख्खं पवार कुटुंब ‘गोविंदबाग’ या शरद पवारांच्या निवासस्थानी पाडवा साजरा करायचं. पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते यायचे. मात्र आता पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. शरद पवार आणि अजित पवार दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. गोविंदबागेत शरद पवारांना तर काटेवाडीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

शरद पवार यांना भेटण्यासाठी असंख्य कार्यकर्ते ‘गोविंदबाग’ या त्यांच्या बारामतीतील निवास्थानी दाखल झालेत. पवारांना भेटण्यासाठी कार्यकऱ्यांनी गर्दी केली आहे. काहीही झालं तरी शरद पवार आमच्यासाठी सर्वकाही आहेत. त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलो आहोत. वर्षानुवर्षे आम्ही त्यांना भेटायला येतो. गेली 18 वर्षे मी शरद पवारांना भेटण्यासाठी, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतो, असं एका कार्यकर्त्याने सांगितलं.

अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते काटेवाडीत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज पाडवा मेळावा आयोजित केला आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडीमध्ये दिवाळीनिमित्त भेटीगाठींचा सोहळा आयोजित केला आहे. पाडव्याची सुरुवात ही काटेवाडीतच झाली आहे, असं म्हणत अजित पवार यांनी आपण काटेवाडीत पाडवा साजरा करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता आज अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्यांनी गर्दी केली आहे. अजित पवार त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करत आहेत. पाडव्याची सुरुवात काटेवाडीतूनच झाली. अजितदादा काम करणारा नेता आहे. त्यांना भेटण्यासाठी आल्याचं कार्यकर्त्याने सांगितलं.

राजकीय दृष्ट्या आम्ही वेगवेगळा मार्ग स्विकारला आहे. मात्र कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत, असं सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबिय म्हणताना दिसले. मात्र आता पहिल्यांदाच बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. त्यामुळे पवारांमध्ये राजकीय संघर्ष सुरु आहे. शिवाय कुटुंबात देखील फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे.

Non Stop LIVE Update
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम.
यंदा पवार कुटुंबाचे वेग-वेगळे पाडवे, दादांच्या बंडानंतर नात्यात फूट
यंदा पवार कुटुंबाचे वेग-वेगळे पाडवे, दादांच्या बंडानंतर नात्यात फूट.
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?.
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्....
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्.....
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'.
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार.
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन.
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'.
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?.
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'.