विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांची कट्टर विरोधकाशी हात मिळवणी; आता राजकीय वैर…

Sharad Pawar Meets Sambhaji Kakde : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार अॅक्शन मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीनंतर पवारांचा दुसरा बारामती दौरा सुरु आहे. आधी दुष्काळी दौरा आणि आता शेतकरी मेळाव्यांना शरद पवार हजेरी लावत आहेत. वाचा सविस्तर बातमी...

विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांची कट्टर विरोधकाशी हात मिळवणी; आता राजकीय वैर...
शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 5:33 PM

लोकसभा निवडणूक संपताच शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची ‘पेरणी’ सुरु केली आहे. शरद पवार सध्या बारामती आणि परिसराचा दौरा करत आहेत. शरद पवार आजपासून पुढचे 3 दिवस बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहेत. 3 दिवसात शरद पवार घेणार 11 शेतकरी मेळाव्यांना शरद पवार हजेरी लावणार आहेत. त्यामुळे शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची अप्रत्यक्षपणे तयारी सुरु केली आहे. या दौऱ्या दरम्यान शरद पवारांनी बारामतीकरांना अनपेक्षित बाब केली. याची बारामतीत चर्चा होतेय.

पवार काकडे कुटुंबियांच्या भेटीला

शरद पवार यांनी काकडे कुटुंबीयांची भेट घेतली आहे. निवडणुकीच्या पूर्वीही शरद पवारांनी ही भेट घेतली होती. काकडे आणि पवार यांचं नेहमीच राजकीय वैर राहिलेलं आहे. संभाजी काकडे आणि शरद पवार हे नेहमीच एकमेकांच्या विरोधात लढताना दिसले. मात्र सध्या शरद पवार काकडे कुटुंबीयांशी जुळवून घेत आहेत. बारामती दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी काकडे कुटुंबाची भेट घेतली आहे. त्यामुळे पवार आणि काकडे कुटुंबातील राजकीय वैर आता संपणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

शरद पवार काय म्हणाले?

आजपासून शरद पवार यांचा बारामती दौरा करत आहेत. या दौऱ्यात योगेंद्र पवारही त्यांच्यासोबत आहेत. शरद पवार यांनी सोमेश्वरनगर इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला. मी दौरा करत आहेत. बारामती लोकसभेत फिरत आहेत. अलीकडे मी लक्ष घालत नव्हतो. दुसऱ्यावर जबाबदारी दिली होती पण आता लक्ष घालावं लागेल. ज्याच्याकडे सत्ता आहे. त्यांनी लोकाच्या हिताची काम केलं पाहिजे पण तसे दिसत नाहीय, असं शरद पवार म्हणाले.

साखर आपण जगात पाठवतो. साखर जेवढी बाहेर जाईल तेवढी साखर दर वाढते. साखर दराकडे केंद्र आणि राज्य सरकारच लक्ष नाही. मी पंतप्रधान मोदी यांना साखर दराबाबत पत्र लिहिले आहे. साखरेला दर मिळावा, त्याबाबत विचार करावा. त्यांनी निर्णय घेतला तर आनंद आहे आणि नाही घेतला तर तुमच्या माध्यमातून सांगायची वेळ आली तर तुमची साथ लागेल, असं आवाहन शरद पवार यांनी सोमेश्वरनगरच्या शेतकऱ्यांना केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.