AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे आभार का मानले? काय आहे कारण?

Sharad Pawar on Gautam Adani : शरद पवारांकडून गौतम अदानी यांचं कौतुक अन् आभारसुद्धा... काय आहे कारण? शरद पवार यांनी बारामतीत बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तेव्हा त्यांनी उद्योगपती अदानी यांचे आभार मानलेत. शरद पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे आभार का मानले? काय आहे कारण?
| Updated on: Dec 24, 2023 | 5:03 PM
Share

बारामती, पुणे | 24 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचे आभार मानलेत. आपण संस्थेच्या मार्फत जगातलं पहिलं नवं टेक्नॉलॉजी सेंटर बनवत आहोत. याला 25 कोटी रुपये लागणार होते. तो 25 कोटी रुपयांचा धनादेश गौतम अदानी यांनी दिला आहे. त्यांचं नाव या ठिकाणी मला घेतलं पाहिजे, असं म्हणत शरद पवार यांनी गौतम अदानी यांचं कौतुक केलं. त्यांचे आभार मानले. बारामतीत नव्या औद्योगिक केंद्राचं निर्माण केलं जात आहे. यासाठी अदानी यांनी मदत केली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी अदानी यांचे आभार मानलेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठाणच्या इंजिनियरिंग विभागाच्या रोबोटिक लॅबचं उद्घाटन झालं. यावेळी शरद पवार बोलत होते. तेव्हा त्यांनी आभार मानलेत.

पवारांकडून आभार

भारतातलं पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सची उभारणी आपण करत आहोत. त्याचं बांधकाम सध्या सुरू आहे. या प्रकल्पाला 25 कोटी रुपये लागणार आहेत. या 25 कोटींची उभारणी करून आम्ही या कामात उडी घेतली आहे. आमच्या दोन सहकाऱ्यांना यासाठी मदत करण्याची विनंती केली. सुदैवाने त्यांनी तातडीने त्याला होकार दिला. सिफोटेक ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील देशातील अत्यंत महत्वाची कंपनी आहे. त्यांनी दहा कोटी रुपयांची मदत यामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो, असं म्हणत शरद पवारांनी आभार मानलेत.

शेती अन् तंत्रज्ञान

आपल्या भागात ऊसाची शेती जास्त आहे. जगात झपाट्याने बदल होत आहेत. ऊसाची साखर बनवण्यासाठी जे तंत्रज्ञान आहे. ते तंत्रज्ञान इथं आणता येईल का? याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जगात जे नवं आहे ते सगळं आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, असंही शरद पवार म्हणाले. भारताकडे तरुणांची मोठी शक्ती आहे. अनेकदा भारताला तरुणांचा देश म्हटलं जातं. या सगळ्या तरुण शक्तीचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. प्रत्येक बदल हा आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जात असतो, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

“चीनकडे जाणारा ओघ भारताकडे आणावा”

टेक्नॉलॉजी ही इंजिनिअरिंग क्षेत्रात झपाट्याने वाढत आहे. आपण देखील नवा बदल स्वीकारला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारावर काम करणाऱ्या लोकांची देशाला आणि जगाला गरज निर्माण झाली आहे. आज आपण बारामतीत जे बनवत आहोत. त्याचा उपयोग सगळ्या विद्यार्थ्यांना होईल. जगातील भरपूर वस्तूच्या उत्पादनाचा ओघ चीनकडे आहे. तो ओघ भारताकडे कसा आणला जाईल, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असा पवार म्हणाले.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.