जीव घेतला तरी बेहत्तर, पण दडपशाही समोर कधीच वाकणार नाही; सुप्रिया सुळे यांचं विधान

Supriya Sule on Devendra Fadnavis and Shinde Government : देवेंद्र फडवणीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसंच दडपशाहीच्या समोर झुकणार नाही. राज्यातील सध्याच्या परिस्थितीत जनता आमच्या बाजूने आहे, असं त्या म्हणाल्या. वाचा...

जीव घेतला तरी बेहत्तर, पण दडपशाही समोर कधीच वाकणार नाही; सुप्रिया सुळे यांचं विधान
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 9:52 PM

बारामती, पुणे | 11 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुठल्याही परिस्थितीत झुकणार नाही, असं म्हटलं. शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी निषेध व्यक्त केला. राज्यात ही दडपशाही सुरू आहे. दडपशाहीच्या समोर सुप्रिया सुळे कधीच वाकणार नाही. ही दडपशाही आहे. याचा मी जाहीर निषेध करते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आम्ही लढणार- सुप्रिया सुळे

आमचा जीव घेतला तरी बेहत्तर… पण आम्ही घाबरणार नाही. दोनशे आमदार असताना रामराज्य आलं पाहिजे. मात्र इथे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्रिपल इंजिन ओके सरकारने कोणती मर्यादा ठेवलेली नाही. आपण कोणत्या जगात आहोत? याबाबत आम्ही ताकदीने लढणार आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

फडणवीस राजीनामा द्या- सुप्रिया सुळे

राज्यात जर महिलांना मारहाण होत असेल. जर राज्यात वकील डॉक्टर, पत्रकार, सुरक्षित नसतील तर मग देवेंद्र फडवणीस यांनी राजीनामा द्यावा. एखाद्या पोलीस ठाण्यात एखादा आमदार त्यांच्यात मित्र पक्षातील सहकार्याला गोळी घालतो. केवळ त्यांनी पैसे घेतले म्हणून गोळ्या घातल्या असं सांगतो. नागपूर महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे का? पुण्यात ठाण्यात आणि नागपूरला या तिन्ही शहरात ज्या पद्धतीने हत्या होत आहेत. हे दुर्दैवी आहे. मग लोकांसाठी न्याय मागायचा का नाही ? राज्यात दडपशाही सुरू आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल

सगळ्यात जास्त पैशाचा घोळ पेटीएमच्या माध्यमातून होत आहे. हा आरबीआयचा डेटा सांगतो. कांद्याच्या निर्यात बंद करण्याचं कारण काय? शेतकऱ्यांच्या दुधाला मिळणारा हमीभाव शेतकऱ्यांना मिळाला का? शेतकऱ्यांच्या विरोधातले हे केंद्र सरकार आहे. पक्ष फोडणं, घरं फोडणं एवढंच काम सरकार करीत आहे. अनेक समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. ओरिसा,आंध्रप्रदेश,जम्मु काश्मीर यांच्या आरक्षणाचा प्रश्न घेतला ? मग मराठा आणि धनगर, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न का घेतला नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.