Video | ITच्या धाडीनंतर पहिलाच बारामती दौरा, महिला म्हणतात “तुमचं काम एक नंबर,” अजितदादांच्या डोळ्यात अश्रू तरळले

बारामती येथे दौऱ्यावर असताना अजित पवार यांचे महिलांनी "अजित दादा तुमचं काम एक नंबर" असे म्हणत तोंडभरून कौतूक केले. विशेष म्हणजे या कौतुकानंतर पवार चांगलेच भावुक झाले. महिलेचे आभार मानताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

Video | ITच्या धाडीनंतर पहिलाच बारामती दौरा, महिला म्हणतात तुमचं काम एक नंबर, अजितदादांच्या डोळ्यात अश्रू तरळले
ajit pawar
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 12:59 PM

बारामती : उपमुख्यंत्री अजित पवार यांना लोक आदराने दादा म्हणतात. अजित पवार राज्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी असतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची बातमी होते. विशेष म्हणजे सामान्य जनतेच्या मनातदेखील अजित पवार यांचं स्थान अढळ आहे. याची प्रचिती बरामती येथे आली. बारामती येथे दौऱ्यावर असताना अजित पवार यांचे महिलांनी “अजित दादा तुमचं काम एक नंबर” असे म्हणत तोंडभरून कौतूक केले. विशेष म्हणजे या कौतुकानंतर पवार चांगलेच भावुक झाले. महिलेचे आभार मानताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

आयकर विभागाच्या धाडीनंतर पवार यांचा पहिलाच बारामती दौरा

अजित पवार नेहमीच लोकांच्या संपर्कात असतात. जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष लोकांना भेटण्याकडे त्यांचा कल असतो. आज पवार बारामतीमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. पवार यांची बहीण, मुलगा तसेच निकटवर्तीय यांची कार्यलये, कंपन्यांवर आयकर विभागाने छापे टकले. या छापासत्रानंतर पवार यांचा बारामतीचा हा पहिलाच दौरा होता. याच कारणामुळे हा दौरा विशेष मानला जात होता. वृक्षारोपण करताना अजित पवार यांच्या आजूबाजूला बऱ्याच महिला उपस्थित होत्या. या महिलांनी अजित पवार यांचे तोंडभरून कौतूक केले. “अजितदादा तुमचे काम एक नंबर आहे. तुम्ही खूप छान काम करता. तुम्ही खूप मोठे व्हा. यशस्वी व्हा. आमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत,” अशा शब्दांत महिलांनी अजित पवार यांचे कौतुक केले.

निवडून देता म्हणून काम करतो

विशेष म्हणजे महिलांनी स्तुती करताच अजित पवार भावुक झाले. त्यांनी  महिलांसमोर थेट हात जोडले. तसेच “तुम्ही निवडून देता म्हणून मी काम करतो,” असे म्हणत अजित पवार यांनी महिलांचे नम्रपणे आभार मानले.

पाहा व्हिडीओ :

सकाळी सहा वाजल्यापासून दौऱ्याला सुरुवात 

दरम्यान, अजित पवार यांचा बारामती दौरा विशेष ठरला. त्यांनी आपल्या दौऱ्याला सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात केली. त्यांनी बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून वृक्षारोपण केले. वृक्षारोपणादरम्यान त्यांनी झाडांबद्दल माहिती घेतली. तसेच विविध सूचना केल्या.

इतर बातम्या :

सकाळी 6 ते रात्री 11, अजितदादांच्या कामाचा धडाका, विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही, रोहित पवारांची स्तुतिसुमनं

नाद करा पण पुणेकरांचा कुठं?, स्पर्धा जिंकली म्हणून गणेश मंडळाकडून 5 महिलांना हेलिकॉप्टर राईड

सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स भाजप नेते चालवतात, ते ज्याचं नाव घेतात त्यावर धाडसत्र सुरु, जयंत पाटलांचं टीकास्त्र

(baramati women appreciated work of ajit pawar he also thanked women with respect)

मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.