पुणे – म्हाडा, टीईटी, आरोग्य भरतीतील घोटाळा उघड झाला आहे. त्याचा तपास सुरु आहे. त्यातच आत एमपीएससीतून (MPSC) अधिकारी झाल्याचे सांगत आयोगाचे बनावट पत्र (Fake letter of commission)तयार केल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर आयोगाचे खोटे पत्र दाखवत सत्कार स्वीकारल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य आयोगाने (Maharashtra State Commission) गंभीर दाखल घेतली आहे. याप्रकरणी औरंगाबादमधील तरुण व अहमदनगर येथील तरुणीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केलं आहे.
अशी केली फसवणूक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळाल्याचे सांगितले अत्यंत खडतर परिस्थतीतून कष्ट घेत हे यश संपादन केल्याची माहिती आरोपीने सगळीकडे राज्य विक्रीकर उपायुक्त पदी निवड झाल्याचे सांगितले. अनेक सत्कार, समारंभाचे कार्यक्रमही केले. त्यानंतर सोशल मीडियावरूनही त्यांनी यासंबधीची माहिती दिली होती. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील तरुणीनेही उपजिल्हाधिकारी झाल्याचे खोटे पत्र तयार करून सत्कार सोहळे करून घेतले. वैष्णवी अर्जुन गिरीअसे या विद्यार्थिनीनेचे नवा आहे. तिने अशाच प्रकारे खोटी कागदपत्रे तयार करत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या तरुणीने उपजिल्हाधिकारी झाल्याचे सांगत एमपीएससीच्या सही आणि शिक्क्याचे खोटे पत्र तयार केले. या पत्रात तिची निवड स्पोर्ट कोट्यातून झाल्याचा उल्लेखही आहे.
दोघांवरही कारवाई होणार
या दोन्ही प्रकारांची गंभीर दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आली आहे. यावरील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील आवताडे यांनी दिली आहे.
बाटगा जास्त कोडगा असतो, नारायण राणेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर, नारायण राणे हे लाचार नेते
थरकाप उडवणारा व्हिडीओ! इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील बाल्कनीला लटकून व्यायाम, नेटकरी म्हणतात…