झिकाच्या भीतीमुळे बेलसर ग्रामपंचायतने वाटले निरोध; चार महिने गर्भधारणा टाळण्याचा सल्ला

गावातल्या 24 गरोदर महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आले आहेत. महिलांच्या रक्ताचे नमुनेही तपासले असून त्यात कोणीही झिका ग्रस्त आढळलेले नाही असे डॉ. भरत शितोळे यांनी सांगितले.

झिकाच्या भीतीमुळे बेलसर ग्रामपंचायतने वाटले निरोध; चार महिने गर्भधारणा टाळण्याचा सल्ला
झिकाच्या भीतीमुळे बेलसर ग्रामपंचायतने वाटले निरोध; चार महिने गर्भधारणा टाळण्याचा सल्ला
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 9:28 PM

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने सतर्क होत विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पुरुषांच्या विर्यात झिकाचे विषाणू आढळत असल्याने गर्भधारणा टाळण्यासाठी व सुरक्षित संभोग व्हावा यासाठी बेलसर गावात पुरुषांना निरोधचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने भोंगागाडीच्या माध्यमातून दारोदारी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. गावात सर्व ठिकाणी धूर फवारणी केली जात आहे. (Belsar Gram Panchayat felt condoms because of Zika’s fear; Advice to avoid four months of pregnancy)

गरोदर महिलांना मच्छरदाणीचे वाटप

गावातल्या 24 गरोदर महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आले आहेत. महिलांच्या रक्ताचे नमुनेही तपासले असून त्यात कोणीही झिका ग्रस्त आढळलेले नाही असे डॉ. भरत शितोळे यांनी सांगितले. गावांमध्ये विविध पद्धतीच्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असून ग्रामपंचायतच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे गावचे उपसरपंच धीरज जगताप यांनी सांगितले.

बेलसरमध्ये आढळला झिकाचा पहिला रुग्ण

राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी 30 जुलै रोजी महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती दिली. झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या 50 वर्षीय महिला रुग्णाची हिस्ट्री तपासणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

झिका विषाणुची लक्षणं कोणती?

झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे, अंगदुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे तसेच या व्हायरल दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरलचे प्रमुख लक्षण आहे. मात्र, सुरूवातीला आलेल्या तापावरून झिका व्हायरल कळणे थोडे कठीण आहे. सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात. हा झिका व्हायरस डासांमुळे होतो. (Belsar Gram Panchayat felt condoms because of Zika’s fear; Advice to avoid four months of pregnancy)

इतर बातम्या

नाकाबंदी सुरु असताना गाडी थांबवली, वाहतूक पोलिसाला दगडाने मारहाण, कल्याणमधील धक्कादायक घटना

जळगावच्या सराफ बाजाराला झळाळी; सोने-चांदी खरेदीकडे गुंतवणूकदारांचा वाढता कल

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.