Pune BJUM vs Amol Mitkari : अमोल मिटकरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अन्यथा…; भाजयुमोची पुण्याच्या संभाजी पोलिसांत तक्रार

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुण्यातील भाजपा युवा मोर्चा आक्रमक झाला आहे. अमोल मिटकरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Pune BJUM vs Amol Mitkari : अमोल मिटकरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अन्यथा...; भाजयुमोची पुण्याच्या संभाजी पोलिसांत तक्रार
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 3:20 PM

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुण्यातील भाजपा युवा मोर्चा आक्रमक झाला आहे. अमोल मिटकरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. भाजपा युवा मोर्चाकडून (Bharatiya Janata Yuva Morcha) संभाजी पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, तर आम्ही कोर्टात जाऊ, इशारा यावेळी भाजपा युवा मोर्चाने दिला आहे. सांगलीच्या (Sangli) इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली होती. त्या सभेत कन्यादान या विषयवार अमोल मिटकरींनी वक्तव्य केलेल होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला होता. कन्या हा दान करण्याचा विषय नाही, असे त्यांनी म्हटले होते. कन्यादानावेळी सांगितलेल्या मंत्राचा अर्थ मी सांगितला होता, असे मिटकरींनी म्हटले होते.

ब्राह्मण महासंघाने केले होते आंदोलन

ब्राम्हण महासंघाने राष्ट्रवादीविरोधात पुण्यात काल आंदोलन केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा दिसून आला होता. मिटकरी मानसिक रुग्ण आहेत, असा हल्ला यावेळी ब्राह्मण महासंघाने केला होता. लग्नाचा विधी, कन्यादान याविषयी अमोल मिटकरी यांनी विधान केले होते. मात्र यामुळे ब्राह्मण, हिंदू समाजाची बदनामी झाल्याचा आरोप ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आला. यावेळी ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याला राष्ट्रवादीनेही विरोध केला.

आणखी वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जातीवाद वाढला नाही हे जयंत पाटलांनी का सांगितलं नाही; शरद पोक्षेंचा सवाल

राजकीय हेतूनं कृष्ण प्रकाश यांची बदली; पिंपरी चिंचवडच्या रिपब्लिकन युवा मोर्चानं मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पाठवला मेल

Pune Ajit Pawar : छत्तीसगडमधून कोळशाची खाण घेण्याचा विचार सुरू; कोळसा टंचाईवर अजित पवार यांची पुण्यात माहिती

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.