भीमा कोरेगावच्या इतिहासाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करा; रामदास आठवलेंची मागणी

देशात दलित समाजावर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत. त्यासाठी देशात समता प्रस्थापित झाली पाहिजे. | Bhima Koregaon battle history

भीमा कोरेगावच्या इतिहासाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करा; रामदास आठवलेंची मागणी
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 1:47 PM

पुणे: कोरेगाव भीमा येथील लढाईचा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश झाला पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाई नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. कोरेगाव भीमाचा (Bhim Koregaon) इतिहास शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे. त्यासाठी मी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहीन व त्यांच्याशी चर्चाही करेन, असे रामदास आठवले यांनी सांगितले. (Ramdas Athawale pay tribute to Bhima Koregaon war memorial)

रामदास आठवले यांनी शुक्रवारी कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशात दलित समाजावर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत. त्यासाठी देशात समता प्रस्थापित झाली पाहिजे. तसेच देशातील दलित-सवर्ण हा वाद मिटला पाहिजे. गावागावात एकी झाली पाहिजे. सवर्ण आणि दलितांमध्ये एकी झाली की, देशाचा विकास झपाट्याने होईल. 2021 मध्ये दलितांना न्याय देण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला.

नवीन वर्षात पक्ष मजबूत करणार: आठवले

नवीन वर्षात रिपब्लिकन पक्ष देशभरात मजबूत करण्याचा आमचा संकल्प आहे. ‘मी रिपब्लिकन’ ही आमची घोषणा असेल, असे आठवलेंनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांना आठवलेंचे प्रत्युत्तर

प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी कोणतीही ठोस योजना नसल्याचे म्हटले होते. या टीकेला रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले. राज्याकडे कोणताही प्लॅन नाही, हे मला माहिती आहे. पण केंद्र सरकारकडे अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी ठोस योजना आहे. आगामी बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर मदत केली जाईल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

एल्गार परिषदेवर प्रकाश आंबेडकर काय बोलले?

एल्गार परिषदेसंदर्भात (Elgar Parishad) काय निर्णय घ्यायचा ते आयोजक ठरवतील. मात्र, आमचे आणि पी बी सावंत यांचे जे उद्दिष्ट होते, ते पूर्ण झाले आहे. कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात आज बोलणं योग्य ठरणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

लोकं सांगतात अन् सरकार फक्त आदेश काढतं; शासनाकडे कोणताच ठोस प्लॅन नाही: प्रकाश आंबेडकर

अजित पवारांकडून भीमा-कोरेगाव युद्धातील शहीदांना अभिवादन, घरातूनच विजयस्तंभाला अभिवादन करण्याचं नागरिकांना आवाहन

एल्गार परिषद होणारच, बी जी कोळसे पाटलांची घोषणा, तारीखही जाहीर

(Ramdas Athawale pay tribute to Bhima Koregaon war memorial)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.