Pune | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय ; पेट्रोल, डिझेलच्या वाहनाचा वापर होणार बंद ; कारण काय?

| Updated on: Apr 02, 2022 | 11:34 AM

इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने नुकतेच महापालिकांनी नवीन वाहने घेताना ई-वाहने घ्यावीत असे आदेशही दिले आहेत. यामुळे पेट्रोल डिझेल वरील वाहनाचा वापर निश्चितच कमी होणार आहे. वाहनांमुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे.

Pune | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय ; पेट्रोल, डिझेलच्या वाहनाचा वापर होणार बंद ; कारण काय?
महापालिका ई- वाहनांच्या वापरास देणारा प्रोत्साहन
Image Credit source: Tv9
Follow us on

पुणे- महानगरपालिकेतील कर्मचारी, अधिकारी तसेच विविध कामांसाठी विविध वाहनाचा वापर केला जातो. मात्र यापुढे अधिकारी वर्ग तसेच वेगवेगळ्या प्रकल्पांच्या (Projects) कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या मालकीच्या पेट्रोल आणि डीझेल वरील वाहनाचा वापर बंद करण्यात येणार आहे.त्याऐवजी इलेक्‍ट्रिक वाहने (Electric vehicles)भाडेकराराने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीला महापालिकेकडून वापरण्यात येणाऱ्या अनेक वाहनाच्या वापराची मर्यादाही संपुष्टात आल्याने  हा निर्णय घेण्यात आले आहे. याशिवाय गेल्या वर्षभरात पेट्रोल- डिझेलच्या किमतीही वाढल्याने यासाठी महापालिकेने (Municipal Corporation)तब्बल 6 कोटी रुपयांनी वाढला आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याकझी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाला खेमणार यांनी दिली आहे.

राज्य शासनाचेही आदेश

इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने नुकतेच महापालिकांनी नवीन वाहने घेताना ई-वाहने घ्यावीत असे आदेशही दिले आहेत. यामुळे पेट्रोल डिझेल वरील वाहनाचा वापर निश्चितच कमी होणार आहे. वाहनांमुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या कामकाजासाठी वापरण्यात येणारी जास्तीत जास्त वाहने ई-कार असतील. त्याची सुरुवात पालिकेच्या मुदत संपलेल्या वाहनांपासून केली जाणार आहे.या वाहनांची यादी तयार करण्याचे आदेश वाहन विभागास देण्यात आले आहेत.

इतक्या कोटींच्या इंधनाची होणार बचत

पुणे महानपालिकेकडे सद्यस्थितीला 900 हून अधिक वाहने आहेत. या वाहनांच्या वापरासाठी महापालिकेला दिवसाला साधारण 7 हजार लिटर डीझेल व 500 लीटर पेट्रोल लागते. दरवर्षी महापालिकेच्या अंदाजपत्रकात यासाठी स्वतंत्रपणे खर्चाची तरतूद करावी लागत आहे. यासाठी येणार खर्चही मोठाही येत होता. महापालिकेतील आयुमर्यादा संपलेली वाहने स्क्रॅपमध्ये टाकण्यात येणार आहे.

Viral video : आनंद पोटात माझ्या माईना! मालकिणीच्या हातातील वस्तू पाहून कुत्रा खूश, असं काही झालं की नेटकरीही अवाक

CM Uddhav Thackeray: कामाच्या गुढ्या उभारू शकत नाहीत, सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारल्या जाताहेत; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

Satish Uke यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला, भावासह 6 एप्रिलपर्यंत कोठडी