Pune : पुण्यातून मोठी बातमी समोर, केदार जाधवच्या वडिलांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश

भारताचा क्रिकेटपटू केदार जाधव याच्या वडिलांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. तीन चार तासांआधी केदार जाधव याचे वडील बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.

Pune : पुण्यातून मोठी बातमी समोर, केदार जाधवच्या वडिलांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 10:22 PM

पुणे : भारताचा क्रिकेटपटू केदार जाधव याच्या वडिलांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. तीन ते चार तासांआधी केदार जाधव याचे वडील बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस वेगाने कामाला लागले आणि अवघ्या काही तासांमध्ये केदार जाधव याच्या वडिलांना त्यांनी शोधून काढलं आहे. केदारने याबाबत स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे. पुण्यातील मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील घोरपडी भागात महादेव जाधव हे सापडले आहेत.

नेमकं काय झालं होतं?

केदार जाधवचे वडील महादेव जाधव हे सकाळी 11.30 सुमारास घराबाहेर पडले होते.  द पॅलेडियमन, सिटी प्राईड कोथरूडमधून ते मेन गेटने बाहेर रिक्षाने गेल्याचं बोललं जात आहे. पाच वाजेपर्यंत ते माघारी न परतल्याने घरच्यांनी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांसह केदार जाधव याने आपल्या सोशल मीडियावरून एक फोटो आणि बेपत्ता असल्याची माहिती देत दिसल्यास संपर्क साधण्याचं आवाहन केलं होतं. पोलिसांनी तपास वेगाने करत अवघ्या चार तासांत वडिलांचा शोध घेतला. केदारने वडील सापडल्यानंतरही पोस्ट  करत सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

केदारने आधी केलेली पोस्ट

केदार जाधवने आपले वडील महादेव दादा जाधव वय अंदाजे 85,  27 मार्च 2023 ला सकाळी 11.30 फिरायला गेले असता स्मृतीभ्रंशामुळे कोथरूड येथून हरवले आहेत. सापडल्यास तात्काळ संपर्क करा, असं त्याने आपल्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे. यामध्ये त्याने संपर्क क्रमांक दिला असून 8530444472 यावर संपर्क साधायला सांगितला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.