पुण्यात धक्कादायक घटना! ट्रक मागे येत असताना अचानक रस्त्याला भगदाड, पाहता-पाहता ट्रक गेला खड्ड्यात

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक ट्रक मागे येत असताना अचानक रस्त्याला खड्डा पडला. हा खड्डा हळहळू इतका खोल होत गेला की, संपूर्ण ट्रक त्यामध्ये फसली. विशेष म्हणजे ट्रकसह आणखी दोन गाड्या देखील त्या खड्ड्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात धक्कादायक घटना! ट्रक मागे येत असताना अचानक रस्त्याला भगदाड, पाहता-पाहता ट्रक गेला खड्ड्यात
ट्रक मागे येत असताना अचानक रस्त्याला भगदाड, पाहता-पाहता ट्रक गेला खड्ड्यात
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 5:42 PM

पुण्यातील समाधान चौक परिसरात रस्त्यात भला मोठा खड्डा पडल्याचा प्रकार समोर आला आहे. सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात हा खड्डा पडला आहे. विशेष म्हणजे रस्त्यात भलंमोठं भगदाड पडल्याने ट्रक खड्ड्यात फसला आहे. ट्रकसह दोन दुचाकीदेखील या खड्ड्यात पडल्या आहेत. घटनेनंतर तातडीने अग्निशामक दलाचे जवान पोहोचले आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांकडून ट्रक बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. पण संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्ता चांगाला असताना त्याला अचानक खड्डा काय पडलो आणि ट्रक पाहता-पाहता थेट 30 ते 40 फूट खाली जातो हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संबंधित ट्रक हा पुणे महापालिकाचा असल्याची माहिती आहे. या घटनेत ट्रक चालक हा थोडक्या बचावला आहे. त्याने प्रसंगावधान साधत थेट ट्रकमधून उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. दरम्यान, आता घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रसत्यावर अचानक हा खड्डा पडला. पुणे महापालिकाचा ट्रक संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास सिटी पोस्ट इमारतीच्या परिसरात आला होता. ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी या ट्रकला बोलवण्यात आलं होतं. पण हा ट्रक रिव्हर्स घेत असताना अचानक मागे भलामोठा खड्डा पडला. हा खड्डा हळहळू खोल होत गेला आणि पुणे महापालिकेचा पू्र्ण ट्रक खड्ड्यात गेला आहे. सुदैवाने या ट्रकच्या चालकाने खिडकीतून उडी मारली. त्यामुळे तो बचावला.

यानंतर आता अग्निशामक दलाच्या जवानांकडून दोरखंडाने ट्रक काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पण ते खूप आव्हानात्मक आहे. खड्डा हा जवळपास 30 ते 40 फूट खोल असल्याचं अग्निशामक दलाच्या जावानांकडून सांगण्यात येत आहे. ट्रकला बाहेर काढण्यासाठी आता जेसीबी बोलावण्यात आलं आहे. जेसीबीच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्यात येणार आहे. अचानकपणे हा खड्डा नेमका पडला कसा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याआधी शहरात अशाप्रकारचा खड्डा कुठेही पडला नव्हता.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.