पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बंगाल पॅटर्न’; भाजप नगरसेविकेचा पती राष्ट्रवादीत

विशेष गोष्ट म्हणजे संतोष बारणे यांच्या पत्नी माया बारणे या भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत. | BJP corporator Husband will join NCP

पिंपरी-चिंचवडमध्ये 'बंगाल पॅटर्न'; भाजप नगरसेविकेचा पती राष्ट्रवादीत
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 12:35 PM

पिंपरी-चिंचवड: आगामी काही दिवसांमध्ये महाविकासआघाडीत मोठ्याप्रमाणावर इनकमिंग होणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांकडून सातत्याने दिला जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आता याचे प्रत्यंतर येताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाभरती होणार आहे. (Incoming in NCP one more bjp leader in Pune will leave the party)

महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे हे आपल्या समर्थकांसह करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे संतोष बारणे यांच्या पत्नी माया बारणे या भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्या भाजपमध्येच राहणार आहेत. फक्त संतोष बारणे हेच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या अनोख्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

येत्या 5 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संतोष बारणे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, संतोष बारणे यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली होती. यामुळे आगामी काळात भोसरी मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

भाजप खासदाराची पत्नी TMC मध्ये गेली, खासदारानं तलाकची नोटीस दिली

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. पश्चिम बंगालचे भाजप खासदार सौमित्र खान (Saumitra Khan) यांची पत्नी सुजाता मोंडल (Sujata Mondal) यांनी थेट ममता बॅनर्जींच्या ( Mamata Banerjee) तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला होता. या प्रकारामुळे त्यांचे पती खासदार सौमित्र खान संतापले होते.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर सौमित्र खान यांनी आपल्या पत्नीला तलाकची नोटीस पाठवण्याचा निर्धार केला होता. इतकंच नाही तर खान हे आडनाव वापरु नको, असा दमही सौमित्र यांनी पत्नी सुजाताला दिला होता.

राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार

सदाशिव पाटील – काँग्रेस – (खानापूर आटपाडी, सांगली) उदेसिंग पाडवी – भाजप (शहादा, नंदुरबार) सीताराम घनदाट (घनदाट मामा) – अपक्ष (गंगाखेड, परभणी) रमेश कदम – राष्ट्रवादी-शेकाप-भाजप-काँग्रेस – (चिपळूण, रत्नागिरी) एकनाथ खडसे – भाजप (मुक्ताईनगर, जळगाव) राजीव आवळे – जनसुराज्य – (हातकणंगले, कोल्हापूर)

संबंधित बातम्या:

अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचा माजी आमदार ‘व्हाया काँग्रेस’ राष्ट्रवादीत

आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

राष्ट्रवादीचा धमाका, अवघ्या दोन महिन्यात तब्बल पाच माजी आमदारांच्या हाती घड्याळ

(Incoming in NCP one more bjp leader in Pune will leave the party)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.