हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार

आपल्या भाषणात शरजिल याने धार्मिक तेढ निर्माण करणारे व्यक्त केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 7:29 PM

पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात भाजपनं तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अॅड. प्रदीप गावडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आपल्या भाषणात शरजिल याने धार्मिक तेढ निर्माण करणारे व्यक्त केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शलजिलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.( BJP demands to file charges against Sharjeel Usmani for making provocative speech )

‘हिंदुस्तान मे हिंदू समाज बुरी तरिकेसे सड चुका है’, शरजिल उस्मानी याचं हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A आणि 295A अनुसार गुन्हा ठरते. या पुढे शरजिल उस्मानी यांनी भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत मी भारतीय संघराज्य मानत नाही असे विधान केले आहे. त्यांचे हे विधान भारतीय संघराज्याचा अपमान करणारे आणि भारतीय संघराज्याबाबत घृणा निर्माण करणारे आहे. जे की भारतीय दंडसंहितेच्या कलम 124A नुसार गुन्हा आहे, अशी तक्रार भाजपकडून करण्यात आली आहे.

एल्गार परिषदेचा संपूर्ण व्हिडीओ मागवला – गृहमंत्री

2017 मध्ये वादग्रस्त ठरलेली एल्गार परिषद यंदा शांततेत पार पडली आहे. या परिषदेत अनेक पुरोगामी नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. या परिषदेवरुन पुन्हा कुठला वाद निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकार आधीच सावध झालं आहे. या संपूर्ण परिषदेचा व्हिडीओ राज्य सरकारनं मागवून घेतल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीय. पुण्यात 30 जानेवारी रोजी एल्गार परिषद पार पडली. त्यात निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, लेखिका अरुंधती रॉय यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

2017 च्या एल्गार परिषदेनंतर वाद

2017 मध्ये पुण्यातील शनिवारवाडा इथं एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा इथं हिंसाचार उसळला होता. त्याचा थेट संबंध पुण्यातील एल्गार परिषदेशी जोडण्यात आला. त्यामुळे या परिषदेत सहभागी अनेक मोठ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील काही लोक आजही कारागृहात आहेत.

संबंधित बातम्या : 

सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली तरी एल्गार परिषद घेऊच; तुरुंग, मरणाला घाबरत नाही: कोळसे-पाटील

मोठी बातमी: पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी नाकारली

BJP demands to file charges against Sharjeel Usmani for making provocative speech

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.