पुण्यात 19 नगरसेवक भाजपला रामराम करण्याची चर्चा, भाजपने चर्चा फेटाळली
पुणे महापालिकेतील 19 भाजप नगरसेवक नाराज असल्याची चर्चांना उधाण आलं आहे. (Sanjay Kakade Comment on Pune BJP Corporators leaving the party)
पुणे : पुणे महापालिकेतील 19 भाजप नगरसेवक नाराज असल्याची चर्चांना उधाण आलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं पुण्यातील वाढतं प्रस्थ आणि राजकीय हस्तक्षेप यामुळेच नगरसेवक नाराज असल्याचं बोललं जातं आहे. हे नाराज नगरसेवक महाविकासआघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र माजी भाजप सहयोगी खासदार संजय काकडे यांनी या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. (Sanjay Kakade Comment on Pune BJP Corporators leaving the party)
“भाजपचा कोणताही सदस्य नाराज नाही. प्रत्येक पक्षात नाराजी असते. त्यामुळे 19 नगरसेवक फुटतील असं शक्य नाही. निवडणुका समोर आल्या की अशा चर्चा समोर येत असतात. आमच्या विरोधी पक्षाने अशा चर्चा केल्या असतील,” असे संजय काकडे म्हणाले.
“औरंगाबाद नामकरणाच्या मुद्द्याला महत्त्व नाही. त्याची आता गरज नाही. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाला महत्व देण्याची गरज नाही. पक्ष जी जबाबदारी देतील ती पार पाडेन,” असेही संजय काकडेंनी सांगितले.
पुणे महापालिकेत भाजपची सत्ता
येत्या 2022 मध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी अद्याप एक वर्ष बाकी असताना आतापासून पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पुणे महापालिकेत भाजपमधील 19 नगरसेवक नाराज असल्याची चर्चा पुढे आली आहे. तसेच हे सर्व नगरसेवक महाविकासआघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान पुणे महापालिकेत 98 नगरसेवकांसह भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र पुण्याच्या राजकारणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सक्रिय झाले आहेत. त्यामुळे शहरातील अनेक भाजप नगरसेवक आणि नेते नाराज आहेत, असे समोर येत आहे. हा त्याचाच एक भाग हा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात ज्याची सत्ता तिकडे पक्षांतराचा जास्त ओढा असतो. त्यामुळे आगामी काळात सर्वच पक्षात पक्षांतर झाल्याचं चित्र पाहायला मिळू शकतं, असे तज्ज्ञांचे म्हणणं आहे. (Sanjay Kakade Comment on Pune BJP Corporators leaving the party)
संबंधित बातम्या :
पुण्यात 19 नगरसेवक भाजपा सोडणार? वाचा काय म्हणतायत गिरीश बापट