हर्षवर्धन पाटील यांना धक्का, खंद्या समर्थकाने सर्व पदं सोडली, भरणेंचे कार्यकर्ते घरी!
माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे खंदे समर्थक भरत शहा (Bharat Shah) यांनी तडकाफडकी त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
इंदापूर (पुणे) : माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे खंदे समर्थक भरत शहा (Bharat Shah) यांनी तडकाफडकी त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आपल्या घरगुती कारणांसाठी शहा यांनी हा राजीनामा दिला असल्याचे ते सांगत आहेत. मात्र यात मोठे राजकारण दडल्याची चर्चा आहे. (BJP Leader Harshvardhan Patil close aid Bharat Shah resigns from all his post)
इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक, इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक इत्यादी पदावर ते सध्या कार्यरत होते. शहा यांच्या राजीनाम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून, इतर राजकीय समीकरणे जुळतात की काय? अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.
भरत शहा यांनी राजीनामा दिल्यानंतर आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थकांनी भरत शेठ यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री दत्ता भरणे विरुद्ध माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं वैर राज्याला परिचीत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमुळे दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. तेव्हापासून दोन्ही नेत्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचं नातं आहे.
2014 ची विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढवली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. मात्र आता यापुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत लोकसभेसह विधानसभा निवडणूकही एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत याबाबत एकमत झालं होतं. त्यामुळं इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादीलाच राहणार की काँग्रेसला दिली जाणार याबाबत संभ्रमाची परिस्थिती होती. त्यातच राष्ट्रवादीकडून लोकसभा-विधानसभा निवडणुकीवेळी आघाडी केली जाते आणि विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीकडून घात केला जातो, असा सूर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमधून उमटतोय.
संबंधित बातम्या
कट्टर विरोधक एकत्र, अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे एकाच मंचावर