‘अजितदादा राजकारणातील पहिले असे नेते जे…’; गिरीश महाजन पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले?

Girish Mahajan on Ajit Pawar : अजित पवारांनी सहकार विभागाच्या डिजीटल पोर्टल कार्यक्रमातील भाषणामध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांचं कौतुक केलं. यावर बोलताना गिरीश महजन यांनी अजित पवारांच्या त्या चॅलेंजची आठवण करून देत त्यांनीही कौतुक केलं.

'अजितदादा राजकारणातील पहिले असे नेते जे...'; गिरीश महाजन पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 2:03 PM

मुंबई : संभाजी भिडे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. विधानसभेतही यावरून विरोधकांनी गदारोळ घालत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडेंचा गुरूजी म्हणत उल्लेख केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली होती. फडणवीसांवर केलेल्या टीकेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना महाजनांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबतही वक्तव्य केलं.

नेमंक काय म्हणाले गिरीश महाजन?

भिडे गुरूजी हे भाजपचे आहेत का? समाजात भाजप बदल विष पेरण्याच काम चालू आहे. बुडणाऱ्या जहाजांमध्ये कोणी बसेल का? शासनाला बदनाम करण्यासाठी विरोधक आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.  येणाऱ्या निवडणूकीत एकही जागा विरोधकांना मिळणार नाही. देशात 350 जागा आम्ही जिंकू आणि येत्या 5 वर्षात आपला देश पॉवरफूल देश असेल. संजय राऊत यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं, त्यांचा भोंगा हळूहळू कमी होत आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

पवारांबद्दल महाजन काय म्हणाले?

आज मैत्री दिवस आहे, अजितदादा आणि आमची मैत्री फार जुनी आहे. मैत्री असली तरी आमचा एकमेकांना राजकीय विरोध आहे. अजित पवारांनी मला वीस वर्षात एक रुपयाचाही निधी दिला नाही. निधी देणार नाही असं चॅलेंज ही त्यांनी आम्हाला दिलं होतं आणि ते पाळलंही आणि तेच दादा आता माझं कौतुक करत होते. दादा नेहमी भेटले की माझे बायसेप चेक करत असतात. मी एवढा फिट कसा याबद्दल ते विचारत असतात. राजकारणातील प्रत्येकाने तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, असं महाजन म्हणाले.

दरम्यान, दादा सुद्धा तब्येतीची काळजी घेतात. रात्री लवकर झोपतात सकाळी लवकर उठतात. अजितदादा राजकारणातील पहिले असे नेते आहेत त्यांचा दिनक्रम सकाळी सहा वाजता सुरू होतो. दादा प्रत्येक गोष्ट ही तंतोतंत पाळत असल्याचं  महाजन यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्.
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले.
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर.
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा.
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?.
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.