पुणे : पुण्यात आज भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या घराबाहेर काँग्रेसनं आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. काँग्रेसकडून (Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागावी म्हणून आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसच्या या आंदोलनानंतर गिरीश बापट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गिरीश बापट यांनी ते काँग्रेस कार्यकर्ते नव्हते तर माझेच कार्यकर्ते होते, असं म्हटलं आहे. तर, बापट यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) डिवचण्याची संधी देखील सोडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष आहे, अशा शब्दात बापट यांनी टीका केली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना देखील 16 मार्चला भेटू असं गिरीश बापट म्हणाले आहेत. पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जगताप यांनी म्हटलं होतं.
गिरीश बापटांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीत दोन चार लोकचं निर्णय घेतात. तो पक्ष परिवारवादी पक्ष आहे, अशी टीका बापट यांनी केलं आहे. बापट यांनी यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशांत जगतापांना आव्हान दिलं आहे. 15 मार्चला 16 नगरसेवक भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याचा दावा प्रशांत जगताप यांनी केला होता. जगताप यांनी दावा केलाय मात्र 16 मार्चला भेटू असं आव्हान गिरीश बापट यांनी दिलं आहे.
आज आंदोलन करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते नव्हते ते माझे कार्यकर्ते होते होते. ते नेहमी मला मदत करतात, असा भाजप खासदार गिरीश बापटांनी गौप्यस्फोट केला आहे.
गिरीश बापट यांनी यावेळी पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपवर कोणाचाही परिणाम होणार नाही. अजित पवारांचा नाही तर कोणाचाच परिणाम आमच्यावर होणार नाही, असं गिरीश बापट म्हणाले. भाजपा पूर्ण बहुमताने सत्तेत येईल असा दावा, खासदार गिरीश बापटांनी केला. काँग्रेसच्या आंदोलक कार्यकर्त्यांचं महत्त्व वाढेल म्हणून विरोध केला नाही, असं देखील ते म्हणाले.
इतर बातम्या :
VIDEO: मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी शिवसेनेने दिली, सोमय्यांचा गंभीर आरोप