Pune Narayan Rane : उद्धव ठाकरे कधी सक्षम मुख्यमंत्री होते? नारायण राणेंचा प्रहार; राष्ट्रपती राजवटीबाबतही व्यक्त केलं मत, म्हणाले…

पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड उगवण्याचे काम करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था (Law & Order) नाही. खून होतायेत, दरोडे पडतायेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले जात नाहीत. अशा काळात राष्ट्रपती राजवट (President Rule) येणे गरजेचे आहे, असे नारायण राणे म्हणाले.

Pune Narayan Rane : उद्धव ठाकरे कधी सक्षम मुख्यमंत्री होते? नारायण राणेंचा प्रहार; राष्ट्रपती राजवटीबाबतही व्यक्त केलं मत, म्हणाले...
भाजपाच्या पत्रकार परिषदेत नारायण राणे (संपादित छायाचित्र)Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 3:28 PM

पुणे : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही. बेबंदशाही चालली आहे. जे सत्तेत आहेत तेच धिंगाणा घालत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यात सुरू असलेल्या वादावर त्यांनी आपले मत व्यक्त करत राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड उगवण्याचे काम करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था (Law & Order) नाही. खून होतायेत, दरोडे पडतायेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले जात नाहीत. अशा काळात राष्ट्रपती राजवट (President Rule) येणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. एका व्यक्तीला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा कायदा असा प्रकार सध्या राज्यात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला मागे नेल्याचा घणाघात नारायण राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केला.

हनुमान चालिसावरून वाद

खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर जो प्रकार केला आणि त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली, त्यावर नारायण राणे म्हणाले, की या देशात लोकशाही आहे. कोणी हनुमाना चालिसा पठण करण्यासाठी येत असेल तर विरोध का. एका व्यक्तीला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा कायदा लावला जात आहे. मुख्यमंत्र्यांचा कोणावरही अंकुश नाही. ना संजय राऊतांवर ना इतर कोणावर. संजय राऊतांचे नाव नको. माझा दिवस खराब जाईल, अशी टीका राणेंनी केली.

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे कधी सक्षम मुख्यमंत्री होते? राज्याचा मुख्यमंत्री सक्षम नाही. राज्याचे प्रश्न त्यांना माहीत नाहीत. 89 हजार कोटींची तूट आहे. या राज्याची व्यवस्था पूर्ण बिघडली आहे. महाराष्ट्राला 10 वर्ष या मुख्यमंत्र्यांनी मागे नेले आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावार भाषण केले, कलानगरच्या नाक्यावर केले तसे, अशी बोचरी टीका राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

आणखी वाचा :

Ravi Rana : रावणाचा अहंकार टिकला नाही, तिथे उद्धव ठाकरेंचा काय टिकणार? आम्हाला फसवलं म्हणत रवी राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

Pune Asim Sarode : हनुमान चालिसा म्हणण्यात देव नाही, तर राजकारण; पुण्यातल्या नास्तिक मेळाव्यात असीम सरोदेंची टीका

PM Modi : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार नाहीत, पत्रिकेवर नाव नसल्याने नवा वाद

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.