सर्वात मोठी बातमी ! कसब्यात भाजपला धक्का, ‘हा’ उमेदवार विजयी होणार, एक्झिटपोलचा निष्कर्ष; तर चिंचवडमध्ये…?

चिंचवडमध्ये मात्र भाजपची मेख बसली. चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्याने पोटनिवडणूक लागली. त्यामुळे भाजपने जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तिकीट दिलं. तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिली.

सर्वात मोठी बातमी ! कसब्यात भाजपला धक्का, 'हा' उमेदवार विजयी होणार, एक्झिटपोलचा निष्कर्ष; तर चिंचवडमध्ये...?
ravindra dhangekarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 10:33 AM

पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार? कोण हरणार? याचीच सर्वांची चर्चा सुरू आहे. खास करून कसब्यात काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच एक मोठी बातमी हाती आली आहे. कसब्यात भाजपचा पराभव होणार असल्याचं एक्झिटपोलच्या निष्कर्षात म्हटलं आहे. तर चिंचवडची जागा भाजप राखणार असल्याचंही एक्झिटपोलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. शिंदे गट आणि मनसेची साथ असतानाही आणि राज्यात सत्ता असतानाही कसब्याचा कौल भाजपच्या विरोधात जात असल्याने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्राब, सायन्स फॉर लाईफ, स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्च या चार संस्थांचा एक्झिट पोल आला आहे. त्यानुसार कसब्याची जागा भाजपच्या हातून जाणार आहे. कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी होणार असल्याचं एक्झिटपोलच्या निष्कर्षात म्हटलं आहे. कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे उभे आहेत. या तिरंगी लढतीत रासने यांना पराभव पत्कारावा लागणार असल्याचं एक्झिटपोलचं म्हणणं आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या विजयी होणार असल्याचं एक्झिटपोलने म्हटलंय. चिंचवडमध्ये जगताप यांना मतदारांची सहानुभूती मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना पराभव पत्करावा लागणार असल्याचं एक्झिटपोलने म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

नुकसान कशामुळे?

कसब्यात भाजपला नुकसान होणार हे सुरुवातीपासूनच दिसत होते. भाजपने चिंचवडमध्ये जगताप कुटुंबाच्या घरात तिकीट दिलं. पण कसब्यात टिळक कुटुंबाच्या घरात तिकीट दिलं नव्हतं. त्यामुळे टिळक कुटुंबीय नाराज होतं. हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरतानाही टिळक कुटुंबीय गैरहजर होते. केवळ टिळक कुटुंबीयच नव्हे तर टिळक समर्थक नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारीही अर्ज भरण्याच्यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे भाजपमधील नाराजी उघड झाली होती.

त्यानंतर कसब्यात काही पोस्टर लागले होते. या पोस्टरमधून ब्राह्मण समाजाने भाजपच्या निर्णयावर जाहीरपणे नाराजी दर्शवली होती. तसेच आम्ही नोटाला मतदान करणार असल्याचं जाहीर केलं होतं. एवढे कमी की काय? हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनीही निवडणुकीच्या मैदानात उतरून भाजपची डोकेदुखी वाढवली होती. थेट हिंदू मतांमध्ये फूट पडल्याने भाजपची चांगलीच गोची झाली होती.

याशिवाय भाजपने खासदार गिरीश बापट यांना नाकात ऑक्सिजनच्या नळ्या असतानाही प्रचारासाठी मैदानात उतरवले. त्याचा निगेटिव्ह परिणाम झाला. त्याचा फटकाही भाजपला बसणार असल्याचं सांगितलं जात आहे. नाही म्हणायला भाजपला मनसेने पाठिंबा दिला होता. पण त्याचा फारसा उपयोग होणार नसल्याचं सांगितलं जात आहे. कारण धंगेकर हे पूर्वाश्रमीचे मनसैनिक आहेत. त्यामुळे मनसेने धंगेकर यांना आतून मदत केल्याचं सांगितलं जातं. शिंदे गटाचं पुण्यात काहीच अस्तित्व नसल्याने त्याचा त्यांना फायदा झाला नसल्याचं सांगितलं जातं.

मेख बसली

चिंचवडमध्ये मात्र भाजपची मेख बसली. चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्याने पोटनिवडणूक लागली. त्यामुळे भाजपने जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तिकीट दिलं. तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिली. याचवेळी ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे वंचितने राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर प्रकाश आंबेडकर यांनी चिंचवडमध्ये कलाटे यांच्यासाठी सभाही घेतल्या. त्यामुळे कलाटे यांचा काटे यांना फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.