पुणे – सातत्याने मागणी होत असलेलया कोरोनावरील बूस्टर डोसला आजपासून सुरुवात झाली आहे. शहरातील जवळपास 179 लसीकरण केंद्रात बूस्टर डोस दिला जाणार आहे. त्यासाठी उपलब्ध डोसच्या 25 टक्के डोस राखीव ठेवण्यात आलेत. शहारातील ज्या केंद्रावर नियमीतपणे लसीकरण सुरु असे लसीकरण केंद्रे, सरकारी रुग्णालये येथे बूस्टर डोसची मात्रा मिळणार आहे. कोरोना काळात कार्यरत असलेल्या फ्रंटलाईन वर्कर, तसेच 60 वर्षे वयोगटाच्या नागरिकांन या बूस्टर डोसची सुविधा मिळणार आहे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत वाढत्या ओमिक्रॉनच्या विषाणूला व कोरोनाच्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी बूस्टर डोसची मात्र फायदेशीर ठरेल असे मत वैद्यकीय तंज्ञाकडून व्यक्त केले जात आहे.
बुस्टर डोसची मात्र मोफत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणानुसार बुस्टर डोसची मात्र मोफत असणार आहे. शहरातील सर्व सरकारी, महापालिका तसच खासगी लसीकरण केंद्रावर हा बुस्टर डोस उपलब्ध असणार आहे . आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स , 60 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. याबरोबरच ज्यांना खासगी हा डोस घ्यायचा असेल त्यांना शुल्काभरतही ही रक्कम मिळणार आहे. आधी जो डोस घेतल्याआहे त्याच्या किमतीत हा बूस्टर डोस मिळणार आहे.
महापौर मुरलीधर मोहळ यांनी बुस्टर डोशाच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. अशी माहिती ट्विट करून दिली आहे.
सोमवारपासून १७९ केंद्रांवर ‘प्रिकॉशन डोस’ उपलब्ध !
पंतप्रधान मा.श्री. @narendramodi जी यांनी केलेल्या घोषणेनुसार आपल्या पुणे महापालिकेच्या सर्व केंद्रावर उद्यापासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. सर्व केंद्रांवर २५ टक्के डोस यासाठी राखीव असणार आहेत.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 9, 2022
या नियमांचे करावे लागेल पालन
लसीचा दुसरा डोस घेऊन 9 महिने उलटले आहेत किंवा 39 आठवडे झालेत, तेच बुस्टर डोस घेऊ शकतात.
नोकरीचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे.
खासगी केंद्रात जरी लस घ्यायची असेल तरीसुद्धा सरकारी केंद्रावर येऊन वर्गवारी नोंदवणे आवश्यक, त्यानंतरच खासगी केंद्रावर लस घेण्यास परवानगी मिळेल.
विशेष म्हणजे सहव्याधी असलेल्या नागरिकांना बुस्टर डोस घेण्यासाठी कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही.
ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांची, फ्रंटलाईन वर्कर्सची, 60 वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांची नोंद कोविण अॅपमध्ये कर्मचाऱ्यांऐवजी नागरिक म्हणून नोंद झालीय, त्यांनाही शासकीय तसच महापालिका केंद्रात थेट नोंदणी करुन लस मिळेल.