कोंबड्यांनी अंडी दिली नाहीत, पुण्यातील पोल्ट्री चालकाची पोलिसात तक्रार

| Updated on: Apr 21, 2021 | 10:39 AM

ते खाद्य सुरू केल्यापासून कोंबड्यांनी अंडी देणेच बंद केले. | Broiler chicken poultry

कोंबड्यांनी अंडी दिली नाहीत, पुण्यातील पोल्ट्री चालकाची पोलिसात तक्रार
Follow us on

पुणे: कोंबड्या अंडी देत नसल्यामुळे पुण्यातील एका पोल्ट्री चालकाने (Broiler chicken poultry) खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत. सध्या पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असली तरी याप्रकरणाचा तपास नेमका कसा करणार, असा पेच पोलिसांसमोर उभा राहिला आहे. (Broiler chicken poultry farm owner files complaint in Police due to hen not giving egg)

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदी म्हातोबाची आळंदी येथील काही पोल्ट्रीमधील कोंबड्यांनी सदोष खाद्यामुळे मागील आठ दिवसापासुन अंडी देणे बंद केले आहे. यामुळे तेथील पोल्ट्री चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संतापलेल्या पोल्ट्री चालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या सगळ्यात आता कारवाई नेमकी कशी करायची, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

म्हातोबाची आळंदी परिसरातील लक्ष्मण भोंडवे हे पोल्ट्री चालक आहेत. त्यांनी 4 एप्रिल रोजी एका कंपनीचे कोंबड्या करिता खाद्य घातले होते. ते खाद्य दररोज दिले जात होते. ते खाद्य सुरू केल्यापासून कोंबड्यांनी अंडी देणेच बंद केले. यामुळे पोल्ट्री चालकांनी एका लॅबमध्ये कोंबड्यांची तपासणी केली. त्यामध्ये नव्याने सुरू केलेल्या खाद्यामुळे अंडी देणे बंद केले आहे, असे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले.
या संपूर्ण प्रकरणाबाबत तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे. आम्ही संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबधित कंपनीवर कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.

संबंधित बातम्या:

कोंबडी ‘ताटातून’ पळाली! कोरोना व्हायरसचा चिकन बाजाराला फटका

राज्यात बर्ड फ्लूच्या अफवेने शेतकऱ्यावर संकट, पोल्ट्री व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ

मटणाचा भाव चिकनच्या दसपट, खवय्यांची मात्र बोकडालाच पसंती

(Broiler chicken poultry farm owner files complaint in Police due to hen not giving egg)