या शहरात एका व्यक्तीकडे सापडले लाखो रुपयांचे ब्राऊन शुगर; ताब्यात घेताच पोलिसांनाही बसला धक्का…
शाहिद अख्तर हुसेन याला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी त्याच्याकडे हे हेरॉईन आले कुठून आणि त्याच्यासोबत आणखी कोण कोण हे काम करत आहे त्याचाही तपास पोलीस करत आहेत.
पुणे : पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 40.44 लाख रुपयांच्या ब्राऊन शुगरसह एकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यात परिसरात गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शाहिद अख्तर हुसेन शेख (वय 49, रा. कोंढवा बुद्रुक येथील इनाम नगर) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून बुधवारी दुपारी शेखला त्याच्या राहत्या घराजवळील रस्त्यावरून त्याला ताब्यात घेण्यातय आले आहे.
शाहिद अख्तर हुसेन शेख याला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून त्याला ज्या वेळी ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याच्याकडे चौकशी करण्यात आली.
मात्र त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 40 लाखांचे ब्राऊन शुगर व हेरॉईनही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एकूण 336.1 ग्रॅम ब्राऊन शुगर म्हणजेच हेरॉईन 40 लाख 33 हजार 200 रुपये किंमतीचे हेरॉईन ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसेच त्याच्याकडून 10 हजार किंमतीचा विवो या कंपनीचा मोबाईल व रोख 1600 रुपये असा एकूण 40 लाख 44 हजार 800 रुपये असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी कोंढवा पोलिसांत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आता त्याचा कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
शाहिद अख्तर हुसेन याला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी त्याच्याकडे हे हेरॉईन आले कुठून आणि त्याच्यासोबत आणखी कोण कोण हे काम करत आहे त्याचाही तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.