Pune crime : अनधिकृत सदनिकांची दस्तनोंदणी करणाऱ्या बिल्डर अन् वकिलांना बेड्या

बोगस एनए (Bogus NA) ऑर्डर व बांधकाम परवानगीच्या सहाय्याने अनधिकृत (Illegal) सदनिकांची दस्तनोंदणी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणांमध्ये चार व्यक्तींना हडपसर (Hadapsar) पोलिसांनी अटक केली.

Pune crime : अनधिकृत सदनिकांची दस्तनोंदणी करणाऱ्या बिल्डर अन् वकिलांना बेड्या
सदनिका (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 11:31 AM

पुणे : बोगस एनए (Bogus NA) ऑर्डर व बांधकाम परवानगीच्या सहाय्याने अनधिकृत (Illegal) सदनिकांची दस्तनोंदणी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणांमध्ये चार व्यक्तींना हडपसर (Hadapsar) पोलिसांनी अटक केली. यात दोन बिल्डर आणि दोन वकील असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून बनावट एनए ऑर्डर (बिगरशेती प्रमाणपत्र) आणि भोगवटापत्र तयार करून शेकडो सदनिकांची नोंदणी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) बड्या अधिकाऱ्यांच्या नावाने 67 बनावट ‘एनए ऑर्डर’, तर महापालिकेच्या नावावर 37 बनावट भोगवटा पत्र अशा सुमारे शंभरहून अधिक केसेस तपासणीत आढळून आल्या आहेत. त्यांच्यावर आता कारवाई तीव्र करण्यात येत आहे.

दुय्यम निबंधकांच्या संगनमताने बोगस दस्तनोंदणी

एजंटकडून यासाठी चक्क विभागीय आयुक्त सौरभ राव आणि तत्कालीन नोंदणी महानिरीक्षक एस. चोक्कलिंगम यांना प्रांताधिकारी म्हणून दाखवित त्यांच्या खोट्या सह्या करून बनावट एन. ए. आदेश तयार केले. यात 10हून अधिक अधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात आल्या आहेत. एजंट दुय्यम निबंधकांच्या संगनमताने बोगस दस्त नोंदणीदेखील झाली आहे.

4 जणांना अटक

या प्रकरणात आता तक्रार दाखल झाली असून हडपसर पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली आहे. स्वाभिमानी ब्रिग्रेड संघटनेच्यावतीने 3 महिन्यांपूर्वी मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांना याबाबत पत्र देण्यात आलं होतं. यानंतर चौकशी केली असता हे प्रकरण उघडकीस आलं…त्यानंतर हा गुन्हा दाखल करत चार जणांना अटक करण्यात आलीये…

आणखी वाचा :

Pimpri Chinchwad : महापालिका तिजोरीत मालमत्ताकरातून 483 कोटी 50 लाखांचा महसूल; 106 मालमत्ता सील

Pune | मित्रांसोबत पोहायला गेला, पण परतलाच नाही; पुण्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू

Mumbai Pune Mumbai प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी, अराखीव कोचसह मासिक पास सुविधा सुरु

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.