पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील शेवाळेवाडी (Shewalewadi), उरुळी देवाची आणि उंड्री गावातील शिवप्रेमींकडून भव्य बैलगाडा शर्यतीचे (Bullock cart racing) अयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत पश्चिम महाराष्ट्रातून 150 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता. अतितटीच्या स्पर्धेत भिलारवाडीतील सुभाष मांगडे या बैलगाडा मालकाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना दोन लाख 31 हजार रुपये, गदा आणि चषक बक्षीस देऊन शेवाळेवाडी केसरी 2022चा किताब देण्यात आला. काल सकाळी दहावाजता शेवाळेवाडी (उरुळी देवीची, ता. हवेली, जि. पुणे) याठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही बैलगाडा शर्यत बघण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो बैलगाडा शौकीन तसेच शेतकरी (Farmers) यावेळी उपस्थित होते. अनेकांनी आपल्या बैलगाड्यांचे स्पर्धेतील क्षण मोबाइल कॅमेऱ्यात कैद केले.
या बैलगाडा शर्यतीची जाहिरातबाजीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचे मैदान अशी जाहिरात आयोजकांकडून करण्यात आली होती. या शर्यतीत भाग घेण्यासाठी स्पर्धकांना दोन हजार प्रवेश फी होती. यात 150 स्पर्धक सहभागी झाले होते. बक्षिसाची रक्कम 2 लाख 31 हजारपासून सुरू होती. रोख रक्कम तसेच गदा आणि चषक असे पुरस्काराचे स्वरूप होते. या स्पर्धेत भिलारवाडीतील सुभाष मांगडे या बैलगाडा मालकाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
#Pune : शेवाळेवाडी, उरुळी देवाची आणि उंड्रीत बैलगाडा शर्यतीचा उत्साह दिसून आला…
पाहा व्हिडिओ – #bullockcartrace #pune #farmers
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/nC9uGMxcFw— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2022
आयोजक शेवाळेवाडी ग्रामस्थ, संघर्ष प्रतिष्ठान पुणे शहर, शिवप्रेमी मित्र मंडळ शेवाळेवाडी, संभाजीराजे प्रतिष्ठाण यांच्यातर्फे 2 लाख 1 हजार, 1 लाख 71 हजार, 1 लाख 51 हजार, 1 लाख 31हजार 1 लाख 1 हजार अशा बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेत भिलारवाडीतील सुभाष मांगडे या बैलगाडा मालकाच्या भारत आणि सुंदर या जोडीला शेवाळेवाडी केसरीचा 2022चा किताब पटकावला आहे. या जोडीला दोन लाख 31 हजार रुपये, गदा आणि चषक बक्षीस देऊन सम्मानित करण्यात आले. तर मिल्खा आणि देवा या जोडीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. सैतान 1130 आणि रुद्र रेटरे या जोडीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. शेतकरी तसेच बैलगाडा मालकही यात उत्साहाने सहभाग घेत असल्याचे दिसत आहे.