पुणे : दावडी घाटात बैलगाडा शर्यतींचा थरार (Bullock cart racing in pune) पाहायला मिळत आहे. दावडी ग्रामस्थांनी येथील सनी नावाच्या बैलाचा वाढदिवस बैलगाडा घाटातच मोठ्या जल्लोषात केक कापून आणि वाजत-गाजत मिरवणूक काढत साजरा केला आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या यात्रा-जत्रांचा उत्सव सुरू असून खेड तालुक्यातील हिंद केसरी (Hind Kesri) दावडी बैलगाडा घाटात काही दिवसांपूर्वी एकट्या बैलाने बैलगाडा ओढत फळीफोड करून पहिल्या नंबरात बारी भिडवून घाटातील सर्वांना अचंबित केले होते. सनी (Sunny) बैल धुरेकरीला जुंपला असताना त्याचा सहकारी जुपनीतून निसटला आणि सनीने एकट्याने बैलगाडा घेऊन पहिल्या नंबरात बारी भिडवली होती. आता पुन्हा एकदा याच दावडी घाटात बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळत आहे.
दावडी ग्रामस्थांनी या सनी बैलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. बैलगाडा घाटातच हा उत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी केक कापून, वाजत-गाजत मिरवणूक काढत सनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सनीला सजवून केक भरून चांदीची गदाही भेट देण्यात आली. मोठ्या संख्येने यावेळी बैलगाडा मालक उपस्थित होते.
#Pune : पुण्याच्या दावडी ग्रामस्थांनी ‘सनी’चा वाढदिवस बैलगाडा घाटातच मोठ्या जल्लोषात केक कापून आणि वाजत-गाजत मिरवणूक काढत साजरा केला. पाहा व्हिडिओ – #bullockcart #Farmers #birthday
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/sGRxwizwjs— TV9 Marathi (@TV9Marathi) April 24, 2022