पुणे – वाढत्या डीझेल दरवाढीचा फटका पुणेकरांना (PUNE) बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पीएमपी प्रशासनाचा डीझेल (DIESEL) खरेदीचा खर्च वाढला असल्यामुळे तिकीट दरवाढ होईल अशी पुण्यात चर्चा आहे. विशेष म्हणजे या आधी दरवाढीचा प्रस्ताव हा संचालक मंडळानं फेटाळला होता. परंतु आता महापालिका मुदत संपल्यानं पालिकेवर प्रशासक (ADMINISTRATOR) म्हणून आयुक्त आहेत. लवकरचं पालिका आणि पीएमपी प्रशासनात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पीएमपीच्या तिकीट दरात वाढ करायची की नाही यावर चर्चा होईल. पीएमपीच्या तिकीट दरात वाढ झाल्यास त्याचा फटका दहा लाख पुणेकरांना बसेल. पीएमपीच्या तिकीट दरात वाढ झाल्यास पाच रूपयाने तिकीट दर वाढ होईल अशी शक्यता आहे. पुण्यात मार्च महिन्याच्या अखेरीस पन्नास ई बस दाखल होणार आहे.
10 लाख पुणेकरांना चिंता
पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दूधाच्या दरात वाढ झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात पन्नास रूपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर दोन दिवसात पेट्रोल आणि डिझेच्या दरात वाढ झाली आहे. झालेल्या दरवाढीचा फटका सामान्य लोकांना बसणार आहे. पीएमपी प्रशासनाचा डीझेल खरेदीचा खर्च वाढल्याने पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण कधीही तिकीट दरवाढ होऊ शकते. दररोज पुण्यात 10 लाख पुणेकर बसने प्रवास करतात. त्यामुळे त्यांना अधिक चिंता आहे. सध्या दरवाढ झाल्यास ती पाच रूपयाने होईल अशी पुण्यात चर्चा आहे. या आगोदर देखील दरवाढ करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने फेटाळला होता. पण महापालिका मुदत संपल्यानं पालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे पुणेकरांचे लक्ष आहे.
पीएमपीच्या ताफ्यात आणखी 200 ई बसेस होणार सामील
शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या दोनशे ई बस खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याबाबत निविदा प्रक्रिया लवकरचं राबविण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस त्यातील पन्नास ई बस दाखल होणार आहे. पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिका देखील शंभर ई बस खरेदी करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामुळे पीएमपीच्या ताफ्यात तीनशे बस दाखल होतील. सध्या पीएमपीकडे साडेतीनशे डिझेलवरती धावणाऱ्या बस आहेत.