पुणे – शहरात ज्वेलर्समध्ये अंगठी खरेदी करण्याच्या बहाणाने चोरी केल्याची घटना घडली आहे. दागिन्यांची ( jewelry)खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन मुलींनी सोनाराची नजर चुकवून अंगठी चोरली आहे. अंगठीची चोरी करणाऱ्या दोन मुलींना सहकारनगर पोलिसांनी (Sahakarnagar police) अटक केली आहे. आरोपी तरुणींनी पारख ज्वेलर्समध्ये सोन्याची अंगठी खरेदी करण्यासाठी आल्या होत्या . खरेदीचा बहाणा करत हातचलाखी करता त्यांनी अंगठी चोरुन नेली होती. याबाबत आनंद हरीलाल पारख (वय – 47 रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली होती. सहकारनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा (crime)तपास करुन आंबेगाव पठार परिसरातील दोन मुलींना अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारआरोपी तरुणी पारख ज्वेलर्समध्ये दागिन्यांच्या खरेदी साठी आल्या होत्या. खरेदी करत असताना त्यांनी अंगठी दाखवण्याची मागणी केली. त्यानंतर हातचलाखी करता अंगठीची चोरी केली. त्यानंतर दोघीही तिथून निघून गेल्या. त्यानंतर अंगठी गायब झाल्याचे ज्वेलर्सच्या लक्षात आले. त्यानंतर ज्वेलर्स मालकाने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली . गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकने आरोपींचा शोध सुरु केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील 70 ते 75 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी दुकानातुन आंगठी चोरून पळून जाणाऱ्या दोन मुली एका ॲक्टिवा गाडीवरुन एलोरा पॅलेसकडून सातारा रोडने कात्रजकडे जाताना दिसल्या.
गाडीचा शोध घेतला असता गाडी आंबेगाव पठार येथील असल्याची माहिती मिळाली. तसेच आरोपी तरुणी या नारायणीनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने परिसरात सापळा रचून दोघींना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून 45 हजार रुपये किमतीची 8 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी 20 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सहकारनगर आणि स्वारगेट पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आली आहेत.
भाजपची कार्यपद्धती देशहिताची नाही, BJP सत्तेत न येणं ही काळाची गरज: Blasaheb Thorat