चाकण एमआयडीसीतून कंपनीचा माल चोरीला गेला, विद्यमान भाजप नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भाजपच्या विद्यमान नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा (Case Filed Against BJP Corporator Husband) दाखल करण्यात आला आहे. चोरलेला माल खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पिंपरीच्या चाकण एमआयडीसीमधील एका खाजगी कंपनीतून चोरलेला माल खरेदी केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमधील विद्यमान भाजप नगरसेविका कमल घोलप यांच्या पतीसह पाच जणांवर चाकण मधील महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 डिसेंबर 2020 ते 29 जानेवारी 2021 या कालावधीत सावरदरी येथील एका खासगी कंपनीतून चोरट्यांनी दोन लाख 40 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेले होते. या प्रकरणी गुन्ह्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली होती.
पोलिसांनी या चोरट्यांची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांनी फरार आरोपी बापू घोलप आणि रशीद यांना माल विक्री केल्याची कबुली दिली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत.
हर्षवर्धन जाधवांसह महिलेला मारहाण करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा नोंदवा, कोर्टाचे आदेश https://t.co/CXxW1WGpdl #HarshvardhanJadhav | #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 3, 2021
Case Filed Against BJP Corporator Husband
संबंधित बातम्या :
हिंदू धर्म नव्हे ‘एल्गार’च सडक्या मेंदूची; ब्राह्मण महासंघाचा हल्लाबोल
पिंपरी-चिंचवडमध्ये सेस्क रॅकेटचा पर्दाफाश, 16 नायजेरियन तरुणी ताब्यात