Pune crime : दगड टाकून रस्ता अडवला म्हणून महिलेला मारहाण; पुण्यातल्या सासवडमध्ये चौघांवर गुन्हा दाखल

यादववाडीतून जाणाऱ्या रस्त्यावर अनिता यादव यांनी रस्ता अडवण्याच्या उद्देशाने दगड टाकले होते. हे दगड टाकल्याने रस्त्यामध्ये अडथळा येत होता. त्यावरून विचारणा केली तर अनिता यादव या अशास्वरुपाची तक्रार लोकांनी केली होती. त्यातून या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचा यादव कुटुंबावर राग होता.

Pune crime : दगड टाकून रस्ता अडवला म्हणून महिलेला मारहाण; पुण्यातल्या सासवडमध्ये चौघांवर गुन्हा दाखल
रस्त्यावर दगड टाकले म्हणून महिलेला मारहाण करणारी व्यक्तीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 4:11 PM

सासवड, पुणे : शेतात जाणाऱ्या रस्त्यावर दगड का टाकले या कारणावरून महिलेला मारहाण (Beating) झाल्याची घटना पुरंदर तालुक्यातील यादववाडीत घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला असून सासवड पोलिसांनी (Saswad police) या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुरंदर तालुक्यातील यादववाडीतून शेतात जाणाऱ्या रस्त्यावर अनिता यादव यांनी रस्ता आडवण्याच्या उद्देशाने दगड टाकले होते. रस्त्यावर दगड का टाकले या कारणावरून अनिता यादव, अनिता यादव यांचा मुलगा सुशांत आणि मुलगी रविना हिला आरोपींनी मारहाण केली. या मारहाणीच्या विरोधात रविनाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. सुभाष यादव, प्रकाश यादव, स्वानंद यादव आणि योगेश यादव यांच्या विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.

महिलेची साडी ओढून केले लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन

15 तारखेला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही मारहाण झाली होती. आरोपींनी पीडितांना हाताने, लाथा बुक्क्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच महिलेची साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारचे घृणास्पद वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर मुलगी रविनाने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपींना अटक केली आहे. तर आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी पीडित कुटुंबातर्फे करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

यादववाडीतून जाणाऱ्या रस्त्यावर अनिता यादव यांनी रस्ता अडवण्याच्या उद्देशाने दगड टाकले होते. हे दगड टाकल्याने रस्त्यामध्ये अडथळा येत होता. त्यावरून विचारणा केली तर अनिता यादव या अशास्वरुपाची तक्रार लोकांनी केली होती. त्यातून या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचा यादव कुटुंबावर राग होता. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात पोलिसांनी कलम 452, 354, 324, 323 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.