सासवड, पुणे : शेतात जाणाऱ्या रस्त्यावर दगड का टाकले या कारणावरून महिलेला मारहाण (Beating) झाल्याची घटना पुरंदर तालुक्यातील यादववाडीत घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला असून सासवड पोलिसांनी (Saswad police) या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुरंदर तालुक्यातील यादववाडीतून शेतात जाणाऱ्या रस्त्यावर अनिता यादव यांनी रस्ता आडवण्याच्या उद्देशाने दगड टाकले होते. रस्त्यावर दगड का टाकले या कारणावरून अनिता यादव, अनिता यादव यांचा मुलगा सुशांत आणि मुलगी रविना हिला आरोपींनी मारहाण केली. या मारहाणीच्या विरोधात रविनाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. सुभाष यादव, प्रकाश यादव, स्वानंद यादव आणि योगेश यादव यांच्या विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.
15 तारखेला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही मारहाण झाली होती. आरोपींनी पीडितांना हाताने, लाथा बुक्क्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच महिलेची साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारचे घृणास्पद वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर मुलगी रविनाने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपींना अटक केली आहे. तर आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी पीडित कुटुंबातर्फे करण्यात आली आहे.
यादववाडीतून जाणाऱ्या रस्त्यावर अनिता यादव यांनी रस्ता अडवण्याच्या उद्देशाने दगड टाकले होते. हे दगड टाकल्याने रस्त्यामध्ये अडथळा येत होता. त्यावरून विचारणा केली तर अनिता यादव या अशास्वरुपाची तक्रार लोकांनी केली होती. त्यातून या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचा यादव कुटुंबावर राग होता. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात पोलिसांनी कलम 452, 354, 324, 323 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.