गजा मारणेच्या अडचणीत वाढ, पिंपरी चिंचवड पोलीस मोक्का लावणार
गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांवर खंडणी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered gaja marne pune)
पुणे : निर्दोष सुटल्यानंतर मिरवणूक काढणे कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marne) याला महागात पडले आहे. गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांवर खंडणी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी शिरगाव चौकी आणि तळेगाव पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे तसेच, त्यापूर्वीच्या फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू घेतल्याचा ठपका गजा मारणेवर ठेवण्यात आला आहे. तसेच गजा मारणे याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारावाई केली जाईल असेही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी सांगितलं. (case registered against gaja marne in pune)
गुन्हा नेमका का?
पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तसेच उर्से टोल नाक्यावर गजा भरणे यांने टोल न भरणे तसेच आधीच्या दुकानातून जबरदस्तीने सामान घेतल्याचे काम त्याच्या साथीदाराने केले होते. तसा आरोप गाजा मारणा आणि त्याच्या साथिदारांवर ठेवण्यात आला आहे.
गजा मारणेची मिरवणूक लँडक्रुझरमध्ये
गजा मारणे तळोजा कारागृहातून सुटल्यांतर त्याची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी या मिरवणुकीत तब्बल तीनशे गाड्या होत्या. तसेच जो ज्या गाडीत बसलेला होता, त्या गाडीची किंमत तब्बल दोन कोटी होती. मिवणुकीत असलेली लँडक्रझर गाडी पुण्यातील काही मोजक्याच लोकांकडे आहे. त्यात गजा मारणेची या गाडीतून मिरवणूक निघाल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली होती. गजा मारणे याच्याकडे असलेली लँडक्रुझर कार ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत नारायण गलांडे यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची होती.
याच आरोपांमुळे गजा मारणे यांची सर्व माहाराष्ट्रात चर्चा झाली होती. गजा मारणे यांने केलेल्या शक्तीप्रदर्शनाचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर राज्याच्या पोलीस व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच गुंडांना रान मोकळं सोडल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला होता. सध्या मिळालेल्या माहितीनुसार आता गाजा मारणे याच्यावर मोक्का अंतर्गतसुद्धा कारवाई केली जाणार आहे.
इतर बातम्या :