Bhor Ram Navmi : पंतसचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत रामजन्म सोहळा साजरा; पाहा Video

भोरमधील (Bhor) पंतसचिव राजवाड्यात (Pantsachiv rajwada) रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा उत्साहात (Celebration) पार पडला. सकाळी 11च्या दरम्यान रामाच्या पोशाखाची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

Bhor Ram Navmi : पंतसचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत रामजन्म सोहळा साजरा; पाहा Video
भोरच्या पंतसचिव राजवाड्यातील राम जन्म सोहळाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 3:59 PM

पुणे : भोरमधील (Bhor) पंतसचिव राजवाड्यात (Pantsachiv rajwada) रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा म्हणजेच रामनवमी उत्साहात (Celebration) पार पडला. सकाळी 11च्या दरम्यान रामाच्या पोशाखाची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 12 वाजता भोर संस्थानचे राजेशराजे आणि सदस्य यांच्या हस्ते जन्मसोहळा झाला. यावेळी रंगबेरंगी पडद्यांनी आणि फुलांनी राजवाडा सजवण्यात आला होता. संस्थानच्या सदस्यांनी पुणेरी पगडी, मराठमोळी शेरवानी आणि स्त्रियांनी नववारी साड्या असे पोशाख परिधान केले होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच रामजन्म सोहळ्यात अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. रामनामाच्या जयघोषात भोरचा राजवाडा परिसर दुमदुमून गेला होता. चैत्र शुद्ध अष्टमीला सकाळी अधिपतिंच्या हस्ते श्रीरामनवमीच्या उत्सवातील धार्मिक व लौकिक कार्यक्रमास सुरूवात होते. या राम जन्मोत्सवाला सुमारे 300 वर्षापेक्षा जास्तची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. तर त्यापैकी सध्या ऐतिहासिक राजवड्यात 150 वर्ष सोहळा साजरा होतो.

ऐतिहासिक परंपरा

भोर तालुक्याच्या ऐतिहासिक परंपरेने पंतसचिवांचे कुलदैवत श्रीराम. भोर संस्थांचे संस्थापक श्रीमंत शंकराजी नारायण यांचे पुत्र नारोपंत यांना पुरंदर तालुक्यातील बेलसर गावातील अंताजी मोरेश्वर खळदकर यांनी 1720मध्ये श्रीरामाची मूर्ती भोर जवळील ज्या ओढ्याकाठी दिल्या त्याला राम ओढा हे नाव मिळाले. त्या पूर्वी पंतसचिवांकडे घरगुती श्रीरामनवमी उत्सव साजरा व्हायचा मात्र ही मूर्ती मिळाल्यापासून श्रीरामनवमी उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाले. भोर येथे राजधानी झाल्यावर व विशेषतः हा नवीन राजवाडा बांधल्यावर उत्सवास मोठे स्वरूप आले. बेलसरच्या अंताजी मोरेश्वर यांनी मूर्ती चैत्र शुद्ध अष्टमी दिल्यामुळे अष्टमी ते दशमी असे तीन दिवस उत्सव साजरा कराण्याची परंपरा सुरू झाली.

सवाद्य मिरवणूक करून पालखी राजावाड्यात

या सभामंडपाचे छत झालर, हंड्या, झुमरे विविध रंगांचे गोळे यांनी सजवलेला असतो. रात्री रोषणाईमुळे राजवड्याचा हा चौक खुलून दिसतो. तर पूर्वी कचेरीत प्रथम नाच, कीर्तन झाल्यावर भाटाचे कवित्व व्हायचे. उत्सवानिमित्त बाहेरगावाहून शास्त्री, वैदिक, हरदास, पुराणिक, गवई, नर्तकी व आश्रित लोकहि हजर असायचे. श्रीरामनवमी हा उत्सवावातील महत्त्वाचा दिवस असल्याने विशेष गडबडीचा व उत्साहाचा असतो. सकाळी हत्ती, घोडे, स्वार, शिबंदी इत्यादी संस्थानचा समग्र लवाजमा श्रीरामाच्या मूर्ती सोनाराकडून आणण्यासाठी जात असे आणि सवाद्य मिरवणूक करून पालखी राजावाड्यात येते. श्रीरामाची मूर्ती वाड्यात आल्यानंतर विधिवत पूजा अर्चा केली जाते.

सभामंडपात राम नामाचा जप

सभामंडपात राम नामाचा जप सुरू असतो. जन्मकाळाचे वेळी मोठा दरबार भरलेला असतो, कीर्तन सुरू असते. बरोबर बारा वाजता सभामंडपातील पाळण्यात श्रीराम मूर्ती ठेऊन पंतसचिवांच्या हस्ते पाळणा हलविला जातो व श्रीरामाचा जन्म उत्सव संपन्न होतो. श्रीरामाचा जन्म झाल्यावर संस्थानकाळात तोफांची सलामी, बंदुकांची फैर, बँड व ताशावाजंत्री यांचा नाद दुमदुमला जायचा. जन्मकाळानंतर पाळणा हलविण्यापासून इतर धार्मिकविधी श्रीमंतांना स्वतः करीत व शेवटी आरती होते. त्यानंतर सुंठवडा व पानसुपारी होऊन दरबार समाप्त होतो, मग इतर कार्यक्रम होत असत.

पंतसचिवाचे वंशज, समस्त नागरिकांतर्फे उत्सव

पुढील दोनतीन दिवसांत उत्सवासाठी आलेल्या नर्तकी, किर्तनकार, भाट, शास्त्री, पुराणिक, कलावंत यांना भोर दरबाराकडून बिदागी देऊन निरोप दिला जायचा. श्रीरामनवमीच्या कालखंडात फक्त ब्राम्हणांना भोजन व्यवस्था असायची मात्र 1923पासून त्रयोदशीला ब्राम्हणेत्तर लोकांना भोजन घालण्याची व्यवस्था सुरू झाली. या उत्सवाच्या खर्चाकरिता राजगड तालुक्यातील चार व पवनमावळ तालुक्यापैकी 24 गावांची सुमारे बारा हजार रुपये उत्पनाची तरतूद करण्यात आली होती. सध्यस्थितीत राम जन्म उत्सवाची परंपरा पंतसचिवाचे वंशज, समस्त नागरिक मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

आणखी वाचा :

Baramati Accident : गाड्यांचा ताफा थांबवून अजित पवारांनी केली अपघातग्रस्तांना मदत

Baramati Accident : गाड्यांचा ताफा थांबवून अजित पवारांनी केली अपघातग्रस्तांना मदत

Baramati Ajit Pawar : ‘…नाहीतर कुणाला तरी काठीनं बदडून काढाल’ ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यक्रमात अजित पवारांची टोलेबाजी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.