Pune crime : मोबाइल हिसकावण्याच्या प्रयत्नात तरुणाच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक, पिंपरी चिंचवडमधला प्रकार; चोरटे पसार

फिर्यादीच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही संशयितांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी विविध लीड्ससह काम करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Pune crime : मोबाइल हिसकावण्याच्या प्रयत्नात तरुणाच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक, पिंपरी चिंचवडमधला प्रकार; चोरटे पसार
चिंचवड पोलीस ठाणे (संग्रहित छायाचित्र)
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 10:20 AM

पिंपरी चिंचवड : मोबाइल लुटण्याचा प्रयत्न करून तीन चोरट्यांनी तरुणाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण (Beaten) केली आहे. पिंपरी चिंचवड परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 28 वर्षीय तरुणाने पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, या मारहाणीत तरुणाच्या डोक्याच्या उजव्या भागावर गंभीर जखमा (Injured) झाल्या आहेत. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार रमेश खरमाटे (28) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करत आहेत. ते तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहेत. वाल्हेकरवाडी परिसरात रात्री 8.15च्या सुमारास तक्रारदार हे एमपीएससी परीक्षेसाठी काही पुस्तके खरेदी करण्यासाठी गुरुद्वारा चौकात गेले असता ही घटना घडली. निर्जन भागातून रेल्वे मार्गावरून ते जात होते. त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

पाठलाग केला

निर्जन भाग असल्याने आसपास कोणीही नव्हते. त्यावेळी तीन लोक त्याच्याजवळ आले आणि त्यापैकी एकाने त्याचा मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. खरमाटे यांनी प्रतिकार करून प्रत्युत्तराचा प्रयत्न केला. त्यानंतर तिघांनी त्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. त्यानंतर दोघांनी त्याला पकडले. तिसऱ्या व्यक्तीने त्यास सिमेंट ब्लॉकने मारले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. यासंबंधी त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.

डोक्याला गंभीर दुखापत

या प्रकरणाचा तपास करणारे उपनिरीक्षक व्यंकट पोटे म्हणाले, की फिर्यादीच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही संशयितांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी विविध लीड्ससह काम करत आहोत.

आणखी वाचा :

Nagpur : लग्न मोडल्यानं पोलिसाला नैराश्य? नागपुरातील तरुण पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या!

Aurangabad | औरंगाबाद ते पुणे अंतर सव्वा तासात पार होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची काय घोषणा?

20 किमीसाठी 80 किमीची टोलवसुली थांबवा, अन्यथा…; पुण्याच्या खेड-शिवापूर टोलनाक्याविरोधात कृती समितीनं काय इशारा दिला, वाचा…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.