VIDEO : पुण्यात दुकानं फोडणारी महिला टोळी सीसीटीव्हीत कैद
पुणे : पुण्यातील बाणेर परिसरात शुक्रवारी 16 नोव्हेंबरला पहाटे महिलांच्या टोळीने दोन दुकांनाचे टाळे फोडून चोरी केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या दोन्हीं दुकानातून तब्बल 50 ते 60 हजार रुपयांचा मुद्देमाल या महिला टोळीने लंपास केला आहे. चतुरशृंगी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. पुण्यामध्ये शुक्रवारी […]
पुणे : पुण्यातील बाणेर परिसरात शुक्रवारी 16 नोव्हेंबरला पहाटे महिलांच्या टोळीने दोन दुकांनाचे टाळे फोडून चोरी केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या दोन्हीं दुकानातून तब्बल 50 ते 60 हजार रुपयांचा मुद्देमाल या महिला टोळीने लंपास केला आहे. चतुरशृंगी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
पुण्यामध्ये शुक्रवारी 16 नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी बाणेर रोड परिसरात दोन दुकानातील पैसे लंपास करतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या परिसरात महिला चोरांची एक टोळी कार्यरत झाली आहे. या टोळीमध्ये सात ते आठ महिला तर एक पुरूष आहे. यामुळे सध्या परिसरात भीतीचे वातावरण आहे.
या महिला चोरीसाठी पहाटेची वेळ निवडतात. रेकी केलेल्या दुकानासमोर घोळका घालून बसतात. ज्याने की रस्त्यावरच्या लोकांना कुठल्याही प्रकारचा संशय येऊ नये आणि नंतर त्यांचे काम सुरू होते. ही टोळी दुकानाचे शटर उघडून त्या छोट्याशा जागेतून एक लहान मुलगी दुकानात शिरते आणि दुकानातील पैस लंपास करते.
बाणेर परिसरात ही घटना घडली आहे. पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान या टोळीने बाणेर रोडवरील लाईफ केअर मेडिकल आणि कॉटर्न आर्ट या कपड्याच्या दुकानामध्ये चोरी केली आहे. महिला टोळीने मेडिकलमधील 40 ते 50 हजाराची रोकड लंपास केली आहे तर कपड्याच्या दुकानातून 10 ते 12 हजार रुपये चोरले आहेत.