चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरण: 10 निलंबित पोलिसांसंदर्भात मोठी अपडेट
चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी मोठी अपडेट....
पुणे : भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी (Chandrakant Patil Shaifek Case) मोठी अपडेट समोर आली आहे. या 10 पोलिसांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाइफेक प्रकरणी निलंबित झालेले 10 पोलीस पुन्हा सेवेत रुजू होणार आहेत. 3 पोलीस अधिकारी (Police) आणि 7 पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होते. या सर्वांवर शिस्तभंगाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलं होतं. मात्र विरोधकांचा दबाव वाढल्यानं या 10 पोलीस पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आलं आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर हत्या करण्याचा गुन्हा दाखल केला गेला. कलम 307 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच 11 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं.यावर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर आता या पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आलं आहे.
चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरण
पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करण्यात आली. त्याचे तीव्र पडसाद उमटले. चंद्रकात पाटील यांनीही त्यावेळी आक्रमक पवित्रा घेतला.
शाईफेक का?
चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात शिक्षणव्यवस्थेवर भाष्य केलं. यावेळी बोलताना महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा उभ्या केल्या असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यांच्या या विधानाचा निषेध झाला. याविधानाचा विरोध म्हणून पिंपरीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.