पुणे महापालिकेला जमतं ते तुम्हाला का जमत नाही? झोपा काढत होता का?, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल

जे पुणे महानगरपालिकेला करता येतं ते राज्य सरकारला का जमत नाही? इतके दिवस काय झोपा काढत होता का?" असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारला विचारलाय.

पुणे महापालिकेला जमतं ते तुम्हाला का जमत नाही? झोपा काढत होता का?, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 10:09 PM

पुणे : “कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी निर्मिती प्रकल्प उभारण्यास पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेतला. त्यामुळे पालिकेला एक महिनाभरात एकाही पालिका रुग्णालयासाठी बाहेरून ऑक्सिजन आणावा लागणार नाही. जे पुणे महानगरपालिकेला करता येतं ते राज्य सरकारला का जमत नाही? इतके दिवस काय झोपा काढत होता का?” असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारलाय. ते शनिवारी (1 मे) पुण्यात गरवारे कॉलेज येथील 58 ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते (Chandrakant Patil criticize Thackeray Government over Oxygen plants in Pune).

केंद्र सरकारने ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लसी हे सर्व आपल्या हातात ठेवले आहे, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केला होता. त्याविषयी विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, “केंद्र सरकारने राज्य सरकारला काम करण्यास अडवलेले नाही. ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यात काहीच अडचण नव्हती. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 महिन्यांपूर्वी सांगितले होते, तर ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यासाठी त्यांनी काय केले, हे सांगावे. राज्य सरकारने ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करून त्यांना निधी आणि प्रोत्साहन दिले नाही. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयांसाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारावेत व त्यासाठी 35 लाखाचा निधी द्यावा, हे आपण 15 दिवसांपूर्वी बैठकीत सांगितल्यानंतर आता सरकारने आदेश काढला.”

“येत्या महिनाभरात महानगरपालिकेच्या एकाही रुग्णालयात बाहेरून ऑक्सिजन घ्यावा लागणार नाही”

“पुण्यात महानगरपालिकेने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी दोन प्रकल्प येत्या सोमवारी सुरू होत आहेत. महापालिकेच्या दळवी रुग्णालयामध्ये 160 ऑक्सिजन बेड असून ती त्यावर चालणार आहेत. महानगरपालिकेने चार नवीन प्रकल्प घेतले आहेत. येत्या महिनाभरात महानगरपालिकेच्या एकाही रुग्णालयात बाहेरून ऑक्सिजन घ्यावा लागणार नाही. हे जर महानगरपालिका करू शकते तर राज्य सरकार काय झोपा काढत होते?”, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

“लशीच्या आयातीसाठी ग्लोबल टेंडर काढणार होते, ते टेंडर आता कोठे गेले?”

चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं, “रेमडेसिवीरच्या बाबतीतही राज्य सरकार राज्यातील कंपन्यांना त्या इंजेक्शनचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन देऊ शकत होते. राज्याच्या पुढाकाराने वाढविलेल्या उत्पादनावर राज्याला अधिकार सांगता आला असता. लसीच्या बाबतीतही केंद्र सरकारने राज्याला पूर्ण मोकळीक दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, लशीच्या आयातीसाठी ग्लोबल टेंडर काढू, हे टेंडर आता कोठे गेले? स्वतः काही करणार नाही आणि प्रत्येक विषयात केंद्र सरकारकडे पाहणार असे या सरकारचे चालू आहे.”

“मुख्यमंत्री 6 महिन्यांपूर्वी कोरोनाची दुसरी लाट येणार म्हणाले, पण त्यासाठी काहीही केलं नाही”

“12 कोटी लशींच्या खरेदीसाठी 6 हजार कोटी 1 रकमी देण्याची राज्य सरकारची तयारी आहे. सरकारकडे एवढे पैसे आहेत तर हातावर पोट असणाऱ्यांना, असंघटित कामगारांना आधी मदत करा. कोरोनाच्या काळात राजकारण करू नका म्हणतात, पण महाविकास आघाडीने काहीही केले तरी विरोधी पक्षाने त्याबद्दल बोलू नये अशी अपेक्षा असेल तर ती चुकीची आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार असे 6 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री म्हणाले पण त्यासाठी काही केले नाही, तर तसे म्हणायचे नाही का? भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाने राज्यात निदर्शने केल्यानंतरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदिवासींच्या खावटी कर्जाचा आढावा घेतला,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला ऑक्सिजन प्लांटसाठी एका नवा पैसा मिळाला नाही, भाजप नेत्यांनी माफी मागावी : काँग्रेस

विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो; चंद्रकांतदादांनी बोलून दाखवली सल

व्हिडीओ पाहा :

Chandrakant Patil criticize Thackeray Government over Oxygen plants in Pune

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.