Ajit Pawar | ‘चंद्रकांत पाटील फार मोठे माणूस, त्यांच्यावर बोलण्यासाठी अजित पवार खूप छोटा माणूस’ , का म्हणाले अजित पवार असे?

पोपटाचा प्राण पुणे ग्रामीण मध्येच आहे. त्यामुळे पक्षाने संकल्प करून बारामतीमधूनच आपण सुरुवात केली. बारामती लोकसभा निवडणूक अतिशय ताकदीने लढलो. त्यासाठी मी स्वतः बारामतीत घर घेऊन राहिलो. काही समीकरणे जुळून आली असती, तर आज वेगळे चित्र पहायला मिळाले असते .

Ajit Pawar | 'चंद्रकांत पाटील फार मोठे माणूस, त्यांच्यावर बोलण्यासाठी अजित पवार खूप छोटा माणूस' , का म्हणाले अजित पवार असे?
अजित पवार
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 11:45 AM

पुणे – चंद्रकांत पाटील म्हणजे एवढी मोठी व्यक्ती आहे. अजित पवार (Ajit pawar) सारख्या छोट्या माणसाने त्यांच्यावर बोलणे योग्य नाही. मोठ्या माणसांच्या बद्दल मोठ्या माणसांना बोलल पाहिजे अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील(chandrakant Patil )  यांच्या वक्तव्याबदल बोलताना केली आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील

काल पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदीप कंद यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील “नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात क्रमांक एकचा पक्ष राहिला. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दुर्बीण लावून शोधण्याची गरज आहे. पोपटाचा प्राण पुणे ग्रामीण मध्येच आहे. त्यामुळे पक्षाने संकल्प करून बारामतीमधूनच आपण सुरुवात केली. बारामती लोकसभा निवडणूक अतिशय ताकदीने लढलो. त्यासाठी मी स्वतः बारामतीत घर घेऊन राहिलो. काही समीकरणे जुळून आली असती, तर आज वेगळे चित्र पहायला मिळाले असते . असे ते म्हणाले होते.

विश्वास घाताने सरकार गेलं  विधानसभा निवडणुकीनंतर विश्वासघाताने सरकार गेलं. पण पाच वर्षात भाजपने अतिशय नम्रपणे काम केल्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोनवेळा शंभरपेक्षा जास्त जागी भाजपला विजय मिळाला. गेल्या विधानसभा निवडणुकीतही युती असूनही भाजपाला 105  जागांवर विजय मिळाला. “कोविडनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रुपाने आपल्याला संधी मिळाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपण पॅनल उभे केल्याने अनेकांच्या पोटात गोळा आला होता. प्रदीप कंद यांची विरोधकांना जास्तच भिती वाटत होती. पण निकालानंतर प्रदीप कंद यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत दमदार प्रवेश झाला. त्यानंतरही संचालकपदाच्या निवडणुकीत कंद यांना ज्या पद्धतीने विजय मिळाला, त्यामुळे विरोधकांना धक्काच बसला. तेव्हा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही फक्त सुरुवात आहे. आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात अजून उलथापालथ होणार आहे. अनेक निवडणुका होणार असून, त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे. असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Nashik | नाशिकमध्ये महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

VIDEO : पोपटाची चालण्याची स्टाईल पाहून हसून लोटपोट व्हाल … व्हिडीओ एकदा पाहाच!

गारठा वाढणारच : रब्बी पिके अन् फळबागांच्या संरक्षणासाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.