वसंतदादा पाटलांचं काय झालं?, पवारांवर आता पुस्तकच यायचं बाकी; चंद्रकांतदादांचा पलटवार

शरद पवारांनी खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा, राजकारण सोडतो, असं आव्हानच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलं होतं. (Chandrakant Patil)

वसंतदादा पाटलांचं काय झालं?, पवारांवर आता पुस्तकच यायचं बाकी; चंद्रकांतदादांचा पलटवार
Chandrakant Patil
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 6:36 PM

पुणे: शरद पवारांनी (sharad pawar) खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा, राजकारण सोडतो, असं आव्हानच शिवसेना नेते संजय राऊत ( sanjay raut ) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांना दिलं होतं. राऊत यांच्या आव्हानाला पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. वसंतदादा पाटलांचं काय झालं? आता पवारांवर केवळ पुस्तकच यायचं बाकी आहे, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला.

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला. आमचं म्हणणं शिवसेनेविषयी होतं. शिवसेनेने आमचा विश्वासघात केला आहे. 2014 ला संजय राऊतांनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. हे जगजाहीर आहे. 145 चा आकडा करण्याचे शिल्पकार हे संजय राऊत आहेत. राऊतांनी हे सरकार बनवलं आहे. राष्ट्रवादी भाजपची एका एका पंचायत समिती खातं आहे. काँग्रेस नसल्यात जमा आहे, असं सांगतानाच शरद पवारांवर फक्त पुस्तक येणं बाकी आहे. तरीही ते म्हणतात, खंजीर खूपसलं नाही. वसंतराव पाटलांच काय झालं?; असा सवाल पाटील यांनी केला.

खंजीर खुपसण्याचं विधान त्यांना झोंबलं

मी खंजीर खूपसलं असं विधान केलं. ते त्यांना जरा झोंबलं. ते कोथळा काढतो असं म्हणाले याविरुद्ध पोलीसात तक्रारी सुरू करा. नारायण राणे थोबाडीत मारतो म्हणाले तर कारवाई केली. मग आम्ही काय मेलेल्या आईचं दूधं प्यायलेलो नाही. आमच्यासोबत विश्वासघात झाला हे आम्ही म्हणायचे नाही का? तुम्ही आम्हाला काय म्हणायचं त्याची स्क्रीप्ट द्या, असा टोलाही त्यांनी लगावला.

परब यांचीही सीबीआय चौकशी होणार?

अजित पवार आणि अनिल परबांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीसात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडे दिवस थांबा कार्यवाहीची मुदत संपत आली आहे. जर ती कार्यवाही झाली नाही, तर कोर्टात दाद मागणार. परमबीर सिंगाच्या पत्रावर सीबीआय लागली तर यांच्यावर ही लागेल, असा सूचक इशारा त्यांनी परब यांना दिला. अनिल देशमुखांनी राजीनामा दिला. जो न्याय लोकांना मिळाला, तेच परबांच्या केसमध्ये होईल, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

राज ठाकरे बोलायला लागले

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विधानाचं समर्थन केलं. राज ठाकरे म्हणाले ते बरोबर आहे. तुम्ही लगेच वेगळा अर्थ काढता. ओबीसी आरक्षणावर एक महिन्यात निर्णय येऊ शकतो. ओबीसींच शिक्षणातलं आरक्षण गेलं नाही. राजकीय आरक्षण गेलंय. राज ठाकरे म्हणाले ते बरोबर आहे, कारण त्यांना आरक्षणाच्या नावाखाली निवडणूका पुढे ढकलायच्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूका हरणार म्हणून ते निवडणूका पुढे ढकलत आहेत. राज ठाकरे आता बोलायला लागलेत. अण्णा हजारे बोलायला लागले आहेत. अशा ताकदी रस्त्यावर उतरल्याशिवाय याचा खोटारडेपणा बाहेर येणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.

कोणत्याही मोठ्या पक्षाबरोबर युती नाही

विदर्भ आणि मराठवाड्यात भाजपने आपली संघटनात्मक ताकद वाढली आहे. आम्ही सहयोगी पक्षाला घेऊन निवडणूका लढणार आहोत. आम्ही मोठ्या पक्षासोबत युती करणार नाही. कारण पुढच्या निवडणूका या ताकदीवर लढवायच्या आहेत, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो; राऊतांचं चंद्रकांतदादांना ओपन चॅलेंज

राज ठाकरे म्हणतात, ओबीसींच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव; चंद्रकांतदादा म्हणाले, राज म्हणतात ते बरोबर!

राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही, जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल; मुनगंटीवारांचा पलटवार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.