संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांचा विषय पुढे आणणे संशयास्पद, मातोश्रीचा पाय उखडायचा आहे?-चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackray) यांच्या 19 बंगल्यांचा विषय अचानक पुढे आणण्यामागचा हेतू संशयास्पद आहे. ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.

संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांचा विषय पुढे आणणे संशयास्पद, मातोश्रीचा पाय उखडायचा आहे?-चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सवाल
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 9:35 PM

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अनेक महिन्यांपूर्वी उघड झालेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackray) यांच्या 19 बंगल्यांचा विषय अचानक पुढे आणण्यामागचा हेतू संशयास्पद आहे. ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.चंद्रकांतपाटील म्हणाले की, संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. तर त्यांनी त्यांच्यावरील आरोपांबाबत बोलायला हवे होते. पाटकर कोण, राऊत कोण, तुमच्या मुलीची व्यावसायिक भागिदारी आहे की नाही, ज्यांना कोविड सेंटरची कामे मिळाली ते कोण, त्यात भागिदारी आहे का याबद्दल संजय राऊत यांनी बोलायला हवे होते. पण त्याऐवजी त्यांनी खूप दिवसांपूर्वी बाहेर आलेला मुख्यमंत्र्यांचा 19 बंगल्यांचा विषय पुन्हा काढून तो विषय पटलावर आणला. तसेच रश्मी उद्धव ठाकरे यांचा विषय पुढे आणला. संजय राऊत यांनी बंगल्यांचा विषय काढण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांचा हेतू संशयास्पद आहे. त्यांना मातोश्री डळमळीत करायची आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

राऊतांची भूमिका संशयास्पद

ज्या आयटी विभागाला पाच वर्षांची तरतूद 380 कोटींची होती, त्या विभागात पंचवीस हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा राऊत यांनी केला. एकूणच सर्व संशयास्पद होते व कोणता विषय का काढला जात आहे हे समजत नव्हते. संजय राऊत हे कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालतात. कोणाच्या ते सर्वांना माहिती आहे. त्या इशाऱ्यानुसार राऊत मातोश्रीचा पाया उखडण्याच्या प्रयत्नात आहेत का, असा इशारा करणाऱ्यांना आपला मुख्यमंत्री करायचा आहे का, त्यांना संजय राऊत यांना मुख्यमंत्री करायचे आहे का, असे प्रश्न संजय राऊत यांनी अचानक मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नीच्या संपत्तीचा विषय पुढे आणल्याने निर्माण झाले आहेत, असे ते म्हणाले.

कठपुतळीच्या खेळाप्रमाणे नाचवतात

महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा हे खूप हुषार राजकारणी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ध्यानात येत नाही की, हे सर्वेसर्वा कठपुतळीच्या खेळाप्रमाणे आपल्याला खेळवत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, हे सुडाचे राजकारण चालू आहे. क्रिया प्रतिक्रिया चालू आहे. त्यांना जे करायचे ते त्यांनी करावे मग आम्हीही आम्हाला जे करायचे ते करू. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

भाजपकडून महावितरणच्या खासगीकरणाच्या वावड्या, खासगीकरणाबाबत ऊर्जामंत्री काय म्हणाले?

राजकारणातलं वाढलेलं प्रदूषण संपणार, आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात

सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील, नाना पटोलेंचा मोदींना इशारा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.