संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही तर काँग्रेसची जुनी परंपरा: चंद्रकांत पाटील
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट मंदिर निर्माणासाठी नव्हे तर एका राजकीय पक्षासाठी निधी गोळा करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. | Chandrakant Patil
पुणे: संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणे ही काँग्रेसची जुनी परंपरा असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट मंदिर निर्माणासाठी नव्हे तर एका राजकीय पक्षासाठी निधी गोळा करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. मला काँग्रेसच्या या आरोपांबद्दल जराही आश्चर्य वाटले नाही. कारण, संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. (Chandrakant Patil slams congress over allegations of misusing ayodhya ram mandir donation)
राम जन्मभूमी ट्रस्टवर आरोप करण्यापूर्वी आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी 1.11 लाख रुपये आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी 11 चांदीच्या विटा या राम मंदिरासाठी दिल्या आहेत? की एखाद्या पक्षाला वर्गणीच्या रुपात दिल्या आहेत ? हे काँग्रेसने आपल्या नेत्यांना सुद्धा विचारावं, असा प्रतिप्रश्नही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला विचारला.
‘अयोध्येतील राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदेने हिंदू महासभेकडून 1400 कोटी घेतले’
रामाच्या नावाने चंदा हाच भाजपचा धंदा आहे. राम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला निधी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून लुबाडला जाऊ शकतो, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला. राम मंदिराच्या उभारणीच्या नावावर महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मोठ्याप्रमाणात रोखीने पैसे गोळा केले जात आहे. सदर पैसा राम मंदिराच्या निर्माण करताच निर्मीत झालेल्या ट्रस्टमध्ये जाईल याची जनतेने काळजी घ्यावी. अन्यथा भाविकांची लूट होण्याची शक्यता आहे, असे सचिन सावंत यांनी म्हटले.
भाजपा आणि संघ परिवाराने राम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता. त्याचे अद्याप काय झाले याची माहिती दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिराकरिता जमा केलेले 1400 कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता, याकडेही सचिन सावंत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
संबंधित बातम्या:
राज ठाकरे एका गोष्टीवर ठाम नसतात, सतत भूमिका बदलतात; अयोध्या दौऱ्यावरुन काँग्रेसचे टीकास्त्र
राज ठाकरे अयोध्येला जाणार, फडणवीसही जाणार, दोघांची मुंबईसाठी युती होणार?
फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडेही जा: नवाब मलिक
(Chandrakant Patil slams congress over allegations of misusing ayodhya ram mandir donation)