VIDEO: 54 साखर कारखान्यांची चौकशी करा; चंद्रकांतदादा अमित शहांना पत्रं लिहिणार
जरंडेश्वर कारखाना हे हिमनगाचं टोक आहे. त्यामुळे सर्वच 54 साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी मी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहून तशी मागणी करणार आहे. (chandrakant patil)
पुणे: जरंडेश्वर कारखाना हे हिमनगाचं टोक आहे. त्यामुळे सर्वच 54 साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी मी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहून तशी मागणी करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. त्यामुळे या 54 साखर कारखान्यांचे संचालक आणि कारखान्यांशी संबंधित राजकारणी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (chandrakant patil will wrote amit shah to enquiry of 54 sugar mills)
चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना ही माहिती दिली. 54 साखर कारखान्यांची कवडीमोल भावात विक्री झाली आहे. त्यामुळे या कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे. जरंडेश्वर तर हिमनगाचं एक टोक आहे. या 54-55 कारखान्यांची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि इतरांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सर्वांची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी अमित शहा यांच्याकडे पत्रं लिहून मागणी करण्यात येणार आहे, असं पाटील यांनी सांगितलं. भाजपच्या काळात काही भ्रष्टाचार झाला असेल तर ही प्रकरणं काढायला कुणी अडवलं?, असा सवालही त्यांनी केला.
ही सुद्धा हुकुमशाहीच
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. मी पत्रं लिहू नये हे सांगणं सुद्धा एक प्रकारची हुकूमशाहीच आहे, अशी टीका त्यांनी केली.
राऊत शिवसेनेचे एकमेव नेते
शिवसेना नेते संजय राऊत दिल्लीत भाजप नेत्यांना भेटल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे ते नेहमी दिल्लीत जात असतात. ते तिकडे कुणाला भेटले त्याबद्दल माहीत नाही, असं सांगतानाच राऊत हे शिवसेनेचे एकमेव नेते आहेत. उद्धव ठाकरे यांचे ते एकमेव नेते आहेत. शिवसेनेकडे त्यांच्या व्यतिरिक्त बाकी नेते नाहीत, असा चिमटाही त्यांनी काढला.
अण्णा हजारे काय म्हणाले होते?
दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही जरंडेश्वरवरच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. जरांडेश्वर काखान्यापासून चौकशीला सुरुवात झाली आहे. आता ईडीने 49 साखर कारखान्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही 4 हजार पानांचं कारखान्यांचं रेकॉर्ड हायकोर्टात दाखल केलं आहे. आता ते सत्र न्यायालयात आहे. केस सुरू आहे. योगायोगाने आता हे प्रकरण ईडीने हातात घेतलं आहे. त्यामुळे यातील सर्व गोष्टी बाहेर येतील अशी आशा आहे, असं हजारे म्हणाले होते. साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची चौकशी होणं महत्त्वाचं आहे. राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. राजकीय पक्ष आणि पार्ट्यांचं काही घेणं नाही. सहकार चळवळ टिकली पाहिजे. तिचं खासगीकरण होणं हा धोका आहे, असंही ते म्हणाले होते. (chandrakant patil will wrote amit shah to enquiry of 54 sugar mills)
संबंधित बातम्या:
ईडी, सीबीआयचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी, राजू शेट्टींचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात, छगन भुजबळ यांचं वक्तव्य
काय आहे जरंडेश्वर कारखाना प्रकरण, अजित पवारांचा नेमका संबंध काय?
(chandrakant patil will wrote amit shah to enquiry of 54 sugar mills)