लग्नाच्या आश्वासनापासून सावध, पुण्यात बनावट लग्न लावणारी टोळी गजाआड, 9 महिलांचा समावेश
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखाने पैसे घेऊन बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय.
पिंपरी चिंचवड : लग्न म्हटलं की विश्वासाच्या नात्यातून दोन परिवार एकत्र येतात अन पती पत्नीच्या संसाराची सुरुवात होऊन दोघेही सुखी संसाराची स्वप्न रंगवतात. अशात याच नात्याचा विश्वासघात झाल्याची घटना घडली तर ती असह्य होते. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये असाच प्रकार घडलाय. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखाने पैसे घेऊन बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 11 जणांच्या टोळीला सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या आरोपींमध्ये 9 महिला, तर 2 पुरुषांचा समावेश आहे. याबाबत गणेश अर्जुन सावळे याने फिर्याद दिली (Cheating Fraud on the name of Marriage in Pune).
मुंबईत अनेकांची भुक भागवणाऱ्या डब्येवाल्याचीच लग्नाच्या नावाने फसवणूक झालीय. लग्न जमवून देणाऱ्यांनी या डबेवाल्याचं विवाहित महिलेशी लग्न लावून दिलं. यानंतर आरोपी महिला लग्नातील दागिण्यांसह फरार होणार त्याआधीच पोलिसांनी या टोळीला अटक केली. आरोपी पत्नी फसवणुकीच्या प्लॅननुसार लग्नानंतर दागिने घेऊन फरार होणार होती. त्याआधीच पोलिसांनी नव्या नवरीसह साथीदारांना अटक केली. विशेष म्हणजे या नव्या नवरीला आधीच 2 मुली होत्या. आरोपीचं नाव सोनाली उर्फ विद्या सतीश खंडागळे असं आहे.
विद्याचा विवाह आळंदीत गणेश साबळे यांच्यासोबत लावण्यात आला. त्यासाठी मध्यस्थीला अडीच लाख रुपये देण्यात आले. लग्नानंतर 8 दिवसांतच नवरी विद्याने आपल्या साथीदारांशी संपर्क केला. तसेच माझे ठरलेले पैसे द्या मी लग्न घरातील पैसे आणि सोने घेऊन पळून येते असं सांगितलं. मात्र, याच संवादाचा पुरावा पीडित गणेश साबळेंच्या हाती लागला. त्यानंतर पीडित गणेश साबळेंनी पोलिसांची मदत घेतली. यानंतर पोलिसांनी नवरीसह 11 जणांना अटक केली.
लग्नगाठी या सात जन्मासाठी बांधल्या जातात असं म्हणतात, मात्र ही म्हण खोटी ठरवत पैशासाठी आता खोट्या लग्नगाठी बांधल्या जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे लग्नासारख्या पवित्र नात्यालाच काळिमा फासल्याचा प्रकार घडलाय.
हेही वाचा :
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू पसार, चार लाखांच्या दागिन्यांसह सासरहून पोबारा
VIDEO: वर्ध्यात एकीकडे नवरी घोड्यावर चढली, दुसरीकडे ‘करवल्याने’ दागिण्यांची बॅग पळवली
नवरदेवाची वरात, वधूच्या दारात, घराला कुलूप लावून वधू पळाली जोरात
व्हिडीओ पाहा :
Cheating Fraud on the name of Marriage in Pune