सौ दर्द छुपे है सिने में… मगर अलग मजा है जिने में… भुजबळांची शेरोशायरीतून तिरंदाजी सुरू असतानाच वीज गेली अन्…
राज्यातील ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खुमासदार शेरोशायरीतून आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुणे: राज्यातील ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खुमासदार शेरोशायरीतून आपल्या भावना व्यक्त केल्या. सौ दर्द छिपे है सिने मै… सौ दर्द छिपे है सिने मै… पर कुछ अलग ही मजा है हसकर जिनें मैं, असं सांगतानाच पुरे पाच साल सरकार काम करेंगी, उसके बाद जायेंगी, असं छगन भुजबळ म्हणाले. भुजबळांच्या खुमासदार शेरोशायरीने भाषण रंगात आलेलं असतानाच अचानक लाईट गेली. त्यानंतरही भुजबळ यांनी भाषण सुरूच ठेवलं. हमारी अवाज दबाने की कोशिश ना करो, असं भुजबळ यांनी म्हणताच एकच खसखस पिकली. निमित्त होतं महात्मा फुले समता पुरस्काराच्या वितरणाचं.
महात्मा फुले यांच्या 131 व्या पुण्यतिथी निमित्त फुले वाड्यात महात्मा फुले समता पुरस्कराचे वितरण करण्यात आलं. यावेळी यंदाच्या महात्मा फुले समता पुरस्काराने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना गौरवण्यात आलं. बघेल यांना फुले पगडी, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आलं. त्यानंतर भुजबळ यांनी तडाखेबंद भाषण करतानाच आपल्या भाषणात शेरोशायरीची पखरण करत रंगत भरली. सौ दर्द छिपे है सिने मै… सौ दर्द छिपे है सिने मै… पर कुछ अलग ही मजा है हसकर जिनें मैं, असं सांगतानाच पुरे पाच साल सरकार काम करेंगी, उसके बाद जायेंगी, असं सांगतानाच सरकारला दोन वर्षी पूर्ण झाली आहेत. पुढची तीन वर्ष ही सरकार पूर्ण करेल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.
नवा व्हेरिएंट येतोय काळजी घ्या
सर्व संकटांवर मात करून सरकार चांगली कामगिरी करत आहे. कोरोनासारख्या जागतिक संकटावर चांगली मात करत आहोत. नैसर्गिक संकट आली, वादळं आल्याने नुकसान झाले होते. तिथेही राज्याने चांगली मदत केली आहे. परदेशी गुंतवणूकिला मोठी सुरवात झाली आहे. कोरोनाचे नवीन व्हेरिएंट येताहेत, त्यामुळे सर्व काळजी घ्या. जेणेकरुन लॉकडाऊनची वेळ येणार नाही, असं भुजबळ म्हणाले.
मुख्यमंत्रीपद येते आणि जाते
मुख्यमंत्रीपद येते आणि जाते. मात्र लोकांसाठी जो लढेल आणि बोलेल तो व्यक्ती लोकांच्या लक्षात राहतो. आज दोन वर्षांपूर्वी मी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजून काही लोकांना हे पचत नाहीय. बाकीचे म्हणतात फेब्रुवारीमध्ये सरकार जाईल, जूनमध्ये जाईल. पण मी तुम्हाला सांगतो महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे काम करेल आणि त्यानंतर पुन्हा निवडून येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
भिडेवाड्यात शाळा भरणार
3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचा 12 फुटाचा पुतळा मुख्य इमारतीच्या समोर उभा राहील. आज मी त्याचे भूमिपूजन करणार आहे. भिडे वाड्याच्याशाळेचं काय झालं? हे विचारणारे खूप भेटतात. पण त्यांना फुले वाड्यात कधी यावसं वाटत नाही… नायगावला कधी यावसं वाटत नाही… पण अखेर आम्हीच तोही निर्णय घेतलाय… होय भिडे वाड्यात मुलींचीच शाळा सुरू होणार… पुणे मनपाच ही शाळा चालवणार, असंही त्यांनी जाहीर केलं.
गुजरात के चार सुपूत है, दो खरीद रहे है, दो बेच रहे है
गुजरात के चार सुपूत है, दो खरीद रहे है, दो बेच रहे है… काँग्रेसने यह किया, वो किया बोलो मत नहीं तो ये बेच डालेगे… असा केंद्रावर घणाघाती हल्ला करत असतानाच लाईट केली. भाषण ऐन रंगात आलेलं असताना लाईट गेल्यानंतरही भुजबळ थांबले नाही. ऐसी हमारी आवाज बंद करने की कोशिश ना करे… हमारी आवाज बंद करणें की कोशिश ना करे, असं भुजबळांनी म्हणताच टाळ्यांचा एकच कडकडाट केला. मात्र अवघ्या काही मिनिटात पुन्हा वीज सुरू झाली आणि भुजबळांनीही टोलेबाजी सुरू ठेवली.
संबंधित बातम्या: