“आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक विकास प्रकल्प सुरू केले”;मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं
या सरकारने विकासात्मक कामाना प्रचंड गती दिल्यामुळेच लोकांच्याही अपेक्षा वाढल्या असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पुणे : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या 9 उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूल, भुयारी मार्गांच्या भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांना भाजप आणि शिवसेनेच्या राज्यात कामाचा धडका कशा पद्धतीने चालू आहे , त्याविषयी बोलताना बंद पडलेले प्रकल्पांना केंद्रातील भाजपमुळे आता गती मिळाल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की, उड्डाणपूलाचं लोकार्पण आणि 11 उड्डाणपूलाचं भूमीपूजन संपन्न झालं आहे.
त्यामुळे मी आजच्या पायाभूत सुविधांच्या महत्वाच्या अशा प्रकल्पांना शुभेच्छा देत असल्याची त्यांनी इच्छाही आज व्यक्त केली. यावेळी झालेल्या वेगवेगळ्या कामांची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
राज्यातली 9 उड्डाणपूल आणि 11 उड्डाणपुलांचे भूमीपूजन करत असतानाही या कामाची दखल घेण्यासारखी आहे. कारण खऱ्या अर्थाने आरोबी बांधण अवघड असते,
त्याच बरोबर आरोबीला बांधायला 10 ते 14 वर्षे काम करावे लागते, मात्र हे काम करत असताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे नेतृत्व मिळाल्यामुळे हे चागंले काम झाले असल्याचे सांगत गडकरींचे यांचे त्यांनी आभार मानले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमुळे राज्यातील विकास प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याचा विकास होताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र आल्यामुळे काय चमत्कार होतो हे आता पाहतो आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
#LIVE | #महारेल | #पुणे | महाराष्ट्रातील ९ उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूल, भुयारी मार्गांच्या भूमिपूजन कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…https://t.co/gX99RZflWw
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 4, 2023
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी मी मुद्दाम आलो आहे. कारण हे काम कष्टाचे आहे, आणि त्याचा मोठा फायदा लोकांना होतो आहे.
या सरकारने विकासात्मक कामाना प्रचंड गती दिल्यामुळेच लोकांच्याही अपेक्षा वाढल्या असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत त्यांनी महारेलचीही आठवण त्यांनी करून दिली.
ते म्हणाले की, जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हापासून महारेलची स्थापन करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. उड्डाणपूल , महारेल आणि मुंबई-वडगाव वंदे भारत या प्रकल्पामुळे राज्यातील नागरिकांना त्यांचा मोठा फायदा झाला आहे आणि भविष्यातही त्याचा फायदा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.