“निवडणूक आयोगाचे निर्णय लोकांना माहिती आहे”;राष्ट्रवादीची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

आजकाल जे तोंड बंद करण्याचे काम चालले आहे ते सगळं आता लोकांच्या लक्षात येत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

निवडणूक आयोगाचे निर्णय लोकांना माहिती आहे;राष्ट्रवादीची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 11:46 PM

पुणेः चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रत्येक पक्षाकडून आपापलाच उमेदवार निवडून येईल अशी खात्री बाळगली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेबरोबरच भाजपवरही जोरदार हल्लाबोल चढविला जात आहे. आजच्या झालेल्या चिंचवडमध्ये झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवरही जोरदार टीका केली आहे.

यावेळी राज्य सरकारवर टीका करताना मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

छगन भुजबळ यांनी पहाटेच्या शपथ विधीवरूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा छेडले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पहाटेचा शपथ विधी आता तुम्ही कशाला काढता, तुमचं पुढचं काय आहे ते आता सांगा असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

वेगवेगळ्या विषयांना बगल देण्यासाठी या गोष्टी देवेंद्र फडणवीस काढत असे म्हणत त्यांनी शरद पवार यांची बाजू उचलून धरली आहे. पहाटेचा शपथ विधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली नसती असं म्हणत त्यांनी शरद पवार यांची बाजू उचलून धरली आहे.

राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी गंभीर आरोप केला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या न्यायालयीन वादावर बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरही गंभीर टीका केली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, आजकाल जे तोंड बंद करण्याचे काम चालले आहे ते सगळं आता लोकांच्या लक्षात येत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

आमदार छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. अदानी यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

भाजपच्या काळात देशात महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढत चालली आहे. त्याबद्दल ना भाजप बोलते आहे ना राज्य सरकार त्यावर काही बोलते आहे.

मात्र आता सर्वसामान्य माणूस एरवी बोलणार नसला तरीही मतदान करताना मात्र योग्य मतदान करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.