गर्भपात आणि आत्महत्या केलेली पूजा एकच, संजय राठोडांची चौकशी झालीच पाहिजे : चित्रा वाघ

चित्रा वाघ यांनी यवतमाळमध्ये गर्भपात झालेली पूजा राठोड आणि आत्महत्या केलेली पूजा चव्हाण एकच असल्याचा दावा केला. (Chitra Wagh Pooja Chavan)

गर्भपात आणि आत्महत्या केलेली पूजा एकच, संजय राठोडांची चौकशी झालीच पाहिजे : चित्रा वाघ
चित्रा वाघ,भाजप नेत्या
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 12:08 PM

पुणे: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यवतमाळमध्ये गर्भपात झालेली पूजा राठोड आणि आत्महत्या केलेली पूजा चव्हाण एकच असल्याचा दावा केला. पुण्यातील पत्रकार परिषदेत वाघ यांनी गौप्यस्फोट केला. पूजा राठोडचा गर्भपात करणारा डॉक्टर दुसऱ्या दिवसापासून आठ दिवसांच्या रजेवर कसा जातो?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. (Chitra Wagh claimed Pooja Chavan and Pooja Rathod whose abortion did at Yavatmal is same)

यवतमाळमध्ये ज्या पूजा राठोडचा गर्भपात करण्यात आला आणि पुण्यात आत्महत्या करणारी पूजा चव्हाण ही एकच आहे. यवतमाळच्या रुग्णालयात ड्युटीवर नसलेला डॉक्टर गर्भपात करतो. दुसऱ्या दिवशी त्याची आई आजारी पडते आणि तो रजेवर जातो, अशा प्रकारचा योगायोग गेल्या 20 ते 24 वर्षांच्या सामाजिक जीवनात बघितलेला नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.

पुणे पोलिसांच्या अहवालावरुन टीका

राज्यात महिला आयोगाला अध्यक्षच नाही, त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, संजय राठोड यांची चौकशीच नाही, मग अहवाल कुठला पाठवला? राठोड यांना पोलिसांना ताब्यात घ्या, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, हे बारा व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये आहे, पूजा चव्हाणसोबत राहणाऱ्या अरुण राठोडच्या मोबाईलवर हा फोन, त्यावेळी संजय राठोड फोनवर होते, असा दावा वाघ यांनी केला.

सिनीअर पीआय दीपक लगड यांना चालवणारा बाप कोण आहे, हे आम्ही शोधून काढू, विधीमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उचलून धरु. पूजा चव्हाणसोबत राहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी दोघांची चौकशीही पोलिसांनी केली नाही, की त्यांना सोडून द्यायचं ठरलं होतं? त्यांच्या घरांना टाळं लागल्याचं मीडियात पाहिलं होतं,असंही वाघ म्हणाल्या.

पूजा चव्हाणचा फ्लॅट सील, वरच्या फ्लॅटमध्ये पाहणी, माझ्या कमरेइतके उंच ग्रील, वानवडी पोलिसातील सिनिअर पीआय लगड यांचा रगेलपणा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

वानवडीत जाऊन चित्रा वाघ म्हणाल्या, पुणे पोलीस दलाल, PI लगड यांच्याशी बाचाबाची

Photo | चित्रा वाघ वानवडी पोलीस ठाण्यात कडाडल्या, पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वानवडी पोलिसांवर गंभीर आरोप

(Chitra Wagh claimed Pooja Chavan and Pooja Rathod whose abortion did at Yavatmal is same)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....